Pakistani Richest Hindu Woman : पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू महिला कोण? इतकी आहे संपत्ती
Pakistani Richest Hindu Woman : मुकेश अंबानी हे भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याची संपत्ती 90 दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे. तर पाकिस्तानचे सर्वाधिक श्रीमंत शाहिद खान यांची संपत्ती 11 दशलक्ष डॉलरच्या जवळपास आहे.
नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : पाकिस्तान (Pakistan) आता आर्थिक डबघाईला आलेला आहे. देशात महागाईने कळस बांधला आहे. गरिब आणि मध्यम वर्गच नाही तर श्रीमंतांना पण त्याचा फटका बसत आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या (Bankruptcy )उंबरठ्यावर आहे. रात्रीतूनच हंगामी सरकार नेमून सध्याच्या सरकारने या कलंकापासून वाचण्यासाठी पळ काढला आहे. पाकिस्तानमधील परिस्थिती तिथल्या सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांतून समोर येते. पाकिस्तानमधील राजकारणी, प्रशासन हे सपशेल अपयशी ठरले आहे. येथील राजकारण्यांनी जनतेला देशोधडीला लावले. पण आजही अनेक जण पाकिस्तानमध्ये श्रीमंत आहेत. भलेही भारतीय श्रीमंतांपेक्षा त्यांची कमाई मोठी नसेल. पण काही उद्योजक श्रीमंत आहेत. पण पाकिस्तानमधील एक हिंदू महिला श्रीमंत (Pakistani Richest Hindu Woman) असून ती वर्षाकाठी जोरदार कमाई करते, हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण गोष्ट खरी आहे. कोण आहे ही महिला, किती आहे तिच्याकडे संपत्ती?
सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याची एकूण संपत्ती 90 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा पण अधिक आहे. तर भारतातील दुसरे श्रीमंत उद्योजक गौतम अदानी आहे. त्यांच्याकडे एकूण 50 अब्ज अमेरिकन डॉलर संपत्ती आहे.
पाकिस्तानमध्ये कोण श्रीमंत
शाहिद खान हे पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे एकूण 11 अब्ज डॉलरच्या जवळपास संपत्ती आहे. फाळणीनंतर अनेक हिंदू कुटूंब आजही पाकिस्तानमध्ये राहतात. त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे अनेकदा समोर येते. तर काही हिंदू आजही चांगल्या स्थितीत आहे. त्यातील काही श्रीमंत पण आहेत. पण त्यांचे प्रमाण बोटावर मोजण्या इतकेच आहे.
श्रीमंत हिंदू महिला कोण?
पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू महिला कोण, असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल. तर त्यांचे नाव संगिता आहे. त्या पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्या परवीन रिझवी (Parveen Rizvi) या नावाने ओळखल्या जातात. त्यांचा जन्म फाळणीपूर्वीचा आहे. पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये त्यांचा दबदबा आहे. त्या दिग्दर्शक आणि निर्माता पण आहेत. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी पाकिस्तान सिनेमात अभिनय सुरु केला. कोहिनूर या चित्रपटातून त्यांनी हा प्रवास सुरु केला. त्यांची या इंडस्ट्रीजतील कामगिरी सातत्याने चमकत गेली.
किती करतात कमाई
पाकिस्तानच्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे. अनेक सुपरहिट सिनेमात त्यांनी जोरदार भूमिका वठवलेल्या आहेत. निकाह, मुठ्ठीभर चावल, यह अमन, नाम मेरा बदनाम अशा अनेक गाजलेल्या पाकिस्तानी चित्रपटात त्यांच्या अदाकारीने चार चांद लावले. एका रिपोर्टनुसार, संगिता या दरवर्षी 39 कोटी रुपयांची कमाई करतात. त्या कोट्याधीश असल्याचे सांगण्यात येते.