Swiggy IPO : शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी, स्विगी आयपीओ आणणार कधी

Swiggy IPO : आयपीओ बाजारात उतरण्यासाठी स्विगी कंपनी पूर्ण तयारी करत आहे. पूर्ण तयारीनिशी ही कंपनी बाजारात उतरेल. त्यासाठीची योजना सुरु आहे. कंपनीने झोमॅटोला टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. ही कंपनी लवकरच आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

Swiggy IPO : शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी, स्विगी आयपीओ आणणार कधी
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 4:29 PM

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी लवकरच आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसाठी स्विगी (Swiggy IPO) मैदानात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीचे तळ्यातमळ्यात सुरु होते. बाजारातील बदलते चित्र त्यासाठी कारणीभूत होते. आता कंपनीने मनाचा हिय्या करत बाजारात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनी लवकरच भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध (Share Market Listing) होण्याची तयारीत आहे. स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटो यापूर्वीच शेअर बाजारात उतरली आहे. ही कंपनी सूचीबद्ध आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये आतापर्यंत 54.8% वाढ झाली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने झोमॅटोला (Zomato) टक्कर देण्यासाठी बाजारात सूचीबद्ध होण्याची तयारी केली आहे. स्विगीमध्ये जपानमधील दिग्गज गुंतवणूक संस्था, सॉफ्टबँकने यापूर्वीच गुंतवणूक केली आहे.

Swiggy ने इतका जमवला निधी

स्विगीने यापूर्वी 2022 मध्ये 10.7 अब्ज डॉलरचा निधी जमावला होता. पण मध्यंतरी त्यांना निधीची कमतरता भासली. जादा मुल्यांकनामुळे गुंतवणूकदारांना हात आखडता घेतला. इतर भारतीय स्टार्टअपसारखंच स्विगीची आयपीओ योजना बारगळली. मंदीच्या भीतीने ही योजना पुढे ढकलली. पण ती टाळली नाही.

हे सुद्धा वाचा

कधी येईल आयपीओ

शेअर बाजारात उतरण्यासाठी स्विगीने तयारी सुरु केली आहे. यापूर्वी पण त्यांनी तयारी केली होती. पण ते मैदानात उतरले नाही. आता हा स्टार्टअप नव्या दमाने बाजारात उतरणार आहे. काही तज्ज्ञांच्या मते, पुढील महिन्यातच स्विगी बाजारात आयपीओ आणू शकते. तर दुसरीकडे काही तज्ज्ञांनी त्यासाठी पुढील वर्षाची वाट पहायला लागू शकते, असे भाकित केले आहे. अर्थात कंपनी त्यावरचा पडदा लवकरच उघडेल.

गुंतवणूकदारांना दिले आमंत्रण

रिपोर्टनुसार, जागतिक आणि भारतीय बाजारात तेजीचे सत्र आहे. त्यामुळे स्विगीने आयपीओ आणण्याची तयारी सुरु केली आहे. स्विगीने आता 8 गुंतवणूकदार बँकांना आयपीओवर काम करण्यासाठी सप्टेंबरच्या सुरुवातीला आमंत्रित केले आहे. यामध्ये मॉर्गन स्टेनली, जेपी मॉर्गन आणि बँक ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे.

कंपनीचे मूल्य तरी किती

सूत्रांच्या माहितीनुसार, Swiggy आयपीओसाठी 10.7 अब्ज डॉलरचा बेंचमार्क असू शकतो. ही रक्कम आयपीओसाठी उपयोगात येऊ शकते. अर्थात ही केवळ शक्यता आहे. बाजारातील काही तज्ज्ञांचा असा अंदाज आहे. याविषीय कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सर्वकाही नियोजनानुसार झाले तर हा आयपीओ जुलै ते सप्टेंबर 2024 या काळात येऊ शकतो. अजून कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.