Home Loan Rates: या 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज; असा आहे व्याजदराचा तपशील

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यानंतर आता सर्वच बँकांनी त्याच पाऊलावर पाऊल ठेवले असले तरी प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळी आहेत. चला तर पाच अशा बँकांच्या गृहकर्जाविषयी जाणून घेऊयात ज्यांचे व्याजदर जास्त असले तरी इतर बँकांच्या तुलनेत स्वस्त आहेत.

Home Loan Rates: या 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज; असा आहे व्याजदराचा तपशील
गृहकर्जात या बँकांचा दिलासा Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 1:22 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केली आहे. रेपो रेट 4.40 वरुन 4.90 टक्के केला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governer Shaktikant Das) यांनी 8 जून रोजी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटसच्या (Basis Point) वाढीची घोषणा केली आहे. केंद्रिय बँकेच्या पाऊलावर पाऊल टाकत इतर बँकांनीही हाच कित्ता गिरवला. या बँकांनीही व्याजदरात वाढ केली. रेपो रेटमधील वृद्धी ही सर्वच कर्जांमधील वाढीची नांदी समजली जाते. याचा सर्वाधिक फटका गृहकर्जदारांवर (Home Loan) पडतो. गृहकर्ज दीर्घ कालावधीसाठी चालते. त्याची रक्कम ही अधिक असते. या व्याज दरवाढीचा परिणामही लागलीच दिसून येतो. ग्राहकांच्या खिश्यावर या व्याजदर वाढीचा भार पडतो आणि त्याचे आर्थिक बजेट कोलमडते. खर्चात त्याला कपात करावी लागते. यासोबतच वाहन कर्जदारांवरही त्याचा परिणाम दिसून येतो. त्यांच्या ही हप्त्यात वाढ होते.

बँक ऑफ महाराष्ट्राचे होम लोन स्वस्त

ज्या बँका स्वस्तात गृहकर्ज देत आहेत. त्यात पाच बँकांचा समावेश आहे आणि या सर्व सरकारी बँका आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र 6.8 टक्क्यांवर किमान व्याज दर आकारत आहे. इतर बँकांच्या तुलनेत बँक ऑफ महाराष्ट्राचे व्याजदर स्वस्त आहेत. तर सर्वाधिक व्याजदर आकारणा-या सरकारी बँकेत पंजाब आणि सिंध बँकेचा वरचा क्रमांक लागतो. ही बँक 7.75 टक्के व्याजदर आकारुन कर्ज देत आहे. गृहकर्जाचा व्याजदर हा तुमची कर्ज रक्कम, त्याचा कालावधी आणि किती कालावधीसाठी कर्ज घेतले आहे, त्याआधारावर कमी जास्त होतो.

हे सुद्धा वाचा

रेपो दरात 35 दिवसांत 0.90 टक्के वाढ

रिझर्व्ह बँकेने 35 दिवसांच्या आत रेपो रेटमध्ये 0.90 टक्क्यांची वाढ केली आहे. केंद्रीय बँकेने 4 मे 2022 रोजी रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. परिणामी व्याजदर 4 टक्क्यांवरुन 4.40 टक्क्यांवर पोहचले होते. त्यानंतर आरबीआयने 8 जून रोजी पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने यावेळी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली. परिणामी यावेळी रेपो रेट 4.40 टक्क्यांवरुन थेट 4.90 टक्क्यांवर जाऊन पोहचला.

स्वस्तात कर्जाचे काळ संपला

बेसिस पॉईंटमध्ये 90 बेसिस पॉईंटची केलेली वाढ बँकांच्या पथ्यावर पडली आहे. तर कोरोनानंतर स्वस्तात कर्ज मिळण्याचा काळ संपुष्टात आला आहे. कॅनरा बँक, एचडीएफसी आणि करुर वैश्य बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. परिणामी ग्राहकांच्या खिश्यावरील ईएमआयचा बोजा वाढणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब आणि सिंध बँक, बँक ऑफ इंडिया यांचे अधिकत्तम व्याजदर अनुक्रमे 8.2 टक्के, 8.25 टक्के, 8.6 टक्के, 7.75 टक्के आणि 8.6 टक्के इतके आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.