Tomato Share Market : पैसाच पैसा! टोमॅटोपेक्षा स्वस्त शेअरमुळे कमाई

Tomato Share Market : शेअर बाजारात असे काही शेअर आहेत, ज्यांच्या किंमती टोमॅटोच्या किंमतीपेक्षा स्वस्त आहे. या शेअरने एका महिन्यातच गुंतवणूकदारांना कमाई करुन दिली आहे. कोणते आहेत हे स्टॉक..

Tomato Share Market : पैसाच पैसा! टोमॅटोपेक्षा स्वस्त शेअरमुळे कमाई
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 2:12 PM

नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : टोमॅटोच्या किंमतींनी (Tomato Price) सर्वसामान्यांच्या तोंडची चव घालवली आहे. दिल्ली, मुंबई, पाटणा, कोलकत्ता, चेन्नई, हैदराबाद, गोवा अथवा पार छोट्या शहरात जरी तुम्ही गेले तरी किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. टोमॅटो लवकरच मेट्रो शहरात 300 रुपयांचा टप्पा गाठेल, असा दावा करण्यात येत आहे. टोमॅटोपेक्षा शेअर बाजारात (Share Market) या स्टॉकची चर्चा रंगली आहे. या शेअरची किंमत टोमॅटोपेक्षा स्वस्त आहे. पण त्यांचा परतावा जास्त आहे. एकीकडे टोमॅटोच्या किंमती भडकल्या आहेत. तर दुसरीकडे शेअर बाजारातील शेअर वधारले आहेत. पण एकीकडे खिसा खाली होत आहे. तर दुसरीकडे कमाई होत आहे.

टोमॅटोचा चढता आलेख

देशात टोमॅटोच्या किंमती दीड महिन्यांपूर्वी 30 रुपये किलो होत्या. हा भाव 250 रुपयांवर पोहचला आहे. तर शेअर बाजारातील काही शेअरच्या किंमती दुप्पटीपेक्षा अधिक झाल्या आहेत. हे शेअर गुंतवणूकदारांना मालामा करण्यात बिलकूल मागे नाहीत.

हे सुद्धा वाचा

टोमॅटोपेक्षा स्वस्त शेअरमुळे मोठी कमाई

Rathi Steel & Power या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात जवळपास 160 टक्के परतावा दिला. 10 जुलै रोजी कंपनीचा शेअर 4.20 रुपयांवर होता. 8 ऑगस्ट रोजी हा शेअर 10.89 रुपयांवर पोहचला. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये दोन टक्क्यांची तेजी दिसून आली.

Teesta Agro Industries च्या शेअरने पण चमात्कार केला. एका महिन्यातच या शेअरने गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिकचा फायदा मिळवून दिला. 10 जुलैनंतर या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 134 टक्के परतावा दिला. आकड्यानुसार, एक महिन्यापूर्वी या कंपनीचा शेअर 45.10 रुपये होता. आता तो 78.84 रुपयांच्या जवळपास आहे.

Sahara Housing Finance ने पण गुंतवणूकदारांना बिलकूल निराश केले नाही. एका महिन्यात कंपनीने 138 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला. 10 जुलै रोजी हा 48.84 रुपये प्रति शेअर होता. मंगळवारी, 8 ऑगस्ट रोजी त्यात दोन टक्क्यांची घसरण आली. सध्या हा शेअर 116.35 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Jai Balaji Industries च्या शेअरमध्ये जवळपास 5 टक्क्यांहून अधिकची वृद्धी दिसून आली. कंपनीचा शेअर 209 रुपयांवर व्यापार करत आहे. एक महिन्यापूर्वी 10 जुलै रोजी हा शेअर 84 रुपयांवर होता. गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांचा परतावा मिळाला.

TIL Ltd चा शेअर मंगळवारी दोन टक्क्यांनी घसरला. कंपनीचा शेअर सध्या 262.05 रुपयांवर व्यापार करत आहे. एका महिन्यापूर्वी हा शेअर 10 जुलै रोजी 127.30 रुपयांवर होता. आता त्यात 112 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.

Shree Global च्या शेअरमध्ये मंगळवारी 4.50 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. या शेअरने 38 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एका महिन्यापूर्वी हा शेअर 16 रुपयांच्या जवळपास होता. एकाच महिन्यात या शेअरने 132 टक्क्यांचा परतावा दिला.

We Win च्या शेअरमध्ये आज दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. एका महिन्यापूर्वी ज्यांनी कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना मोठा फायदा झाला असता. त्यांना एका महिन्यात कमाई करता आली असती. आज हा शेअर 95 रुपयांच्या पुढे आहे. एक महिन्यापूर्वी हा शेअर 46 रुपयांवर होता.

Emerald Leisures च्या शेअरमध्ये मंगळवारी जवळपास दोन टक्क्यांची घसरण दिसली. एका महिन्यात कंपनीचा शेअर जवळपास 87 रुपयांवर होता. आज हा शेअर 172.60 रुपयांवर पोहचला. एकाच महिन्यात या शेअरने 100 टक्के परतावा दिला.

सूचना : टीव्ही9 मराठी गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकीचा सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.