RBI Monetary Policy : नाही वाढणार EMI, तज्ज्ञांच्या दाव्याने अनेकांचा जीव भांड्यात

RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैटक पुढील आठवड्यात होत आहे. यावेळी पण रेपो दरात कोणतीही वाढ होणार नाही, असा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

RBI Monetary Policy : नाही वाढणार EMI, तज्ज्ञांच्या दाव्याने अनेकांचा जीव भांड्यात
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 6:48 PM

नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : महागाईने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. महागाईचे उड्डाणे थांबता थांबत नसल्याने सर्वच जण मेटाकूटीला आले आहेत. त्यातच आता भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती (RBI Monetary Policy) रेपो दराविषयी पुन्हा समिक्षा करणार आहे. त्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. रेपो दरात वाढ झाल्यास कर्जदारांच्या मानगुटीवर ईएमवाय वाढीचा बोजा पडण्याची भीती आहे. तर काही अर्थतज्ज्ञांनी रेपो दर जैसे थे राहतील, असा दावा केला आहे. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम राहण्यासाठी पतधोरण समिती रेपो दरात बदल करणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे कर्जदारांचा जीव भांड्यात पडला आहे.

समितीची या आठवड्यात बैठक

आरबीआय गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यांची पतधोरण समितीची (MPC) बैठक या आठवड्यात होईल. ही बैठक 8-10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. गर्व्हनर शक्तिकांत दास रेपो दराविषयीची घोषणा 10 ऑगस्ट रोजी करतील.

हे सुद्धा वाचा

व्याजदर राहतील स्थिर

एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे एमडी त्रिभुवन अधिकारी यांनी मत मांडले. त्यांच्या मते, आरबीआयची एमपीसी यावेळी व्याजदर स्थिर ठेवले. त्यात येत्या काही दिवसात वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

महागाईचा परिणाम नाही

यस बँकचे मुख्य अर्थशास्त्री इंद्रनील पेन यांनी मत मांडले. त्यांच्या मते, टोमॅटोसह इतर भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढल्या असल्या तरी त्याचा रेपो दरावर कुठलाही परिणाम होणार नाही.

जून महिन्यात महागाईचा चढता आलेख

देशात महागाई आटोक्यात असावी. ती 4 टक्क्यांच्या जवळपास असावी, यासाठी आरबीआय धोरण निश्चत करते. किरकोळ महागाईत 2 टक्क्यांची चढउतार होणार आहे. ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारीत महागाई दर जून महिन्यात 4.81 टक्क्यांवर पोहचला आहे. हा या तीन महिन्यातील सर्वात उच्चांक आहे.

भाजीपाला, धान्याचे दर वाढले

जून महिन्यात महागाईने उंच भरारी घेतली. टोमॅटोच्या किंमतीत 400 टक्क्यांची वाढ आली. अनेक ठिकाणी टोमॅटो 250 रुपयांवर पोहचला. खरीप पिकांवर मोठे संकट आले. मुसळधार पावसाने गणित बिघडवले. अद्रक, बटाटे, भेंडी, मिरची यांच्यासह इतर भाजीपाला महागला. त्यामुळे किचन बजेट विस्कळीत झाले.

तांदळाच्या किंमती वधारल्या

तांदळाच्या किंमतीत मोठी उसळी आली. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाची निर्यात थांबवली. तुरदाळ आणि इतर दाळींनी डोके वर काढले आहे. किरकोळ बाजारात तुरदाळ 180 ते 200 रुपये प्रति किलोवर पोहचल्या आहेत. गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

वर्षभरात व्याजदरात मोठी वाढ

व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. एप्रिल आणि त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात वाढ झाली नाही.

Non Stop LIVE Update
detail
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.