Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती खरंच 150 रुपयांच्या घरात जाणार? जर-तरचं गणित तरी काय, आजचा भाव घ्या जाणून

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाने भरारी घेतल्यापासून अनेक देशांना उद्याची फिक्र पडली आहे. सोशल माध्यमातून तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती थेट 150 रुपये प्रति लिटरच्या घरात जाणार असल्याचा दावा ठोकण्यात येत आहे. खरंच असं होणार आहे का?

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती खरंच 150 रुपयांच्या घरात जाणार? जर-तरचं गणित तरी काय, आजचा भाव घ्या जाणून
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 8:47 AM

नवी दिल्ली : कच्चा तेलाने एक्सीलेटर दाबल्याने किंमती झरझर वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने (Crude Oil) भरारी घेतली आहे. अमेरिका आणि युरोपला धडा शिकवण्यासाठी ओपेकसह  (OPEC+) रशियाने खेळी खेळली. अचानक तेल उत्पादन घटविण्याचा फैसला त्यांनी जाहीर केला. या आठवड्याच्या सुरुवातीला हा निर्णय घेतला. त्याचा फटका आता सर्वच अर्थव्यवस्थांना बसणार आहे. चीनने मोठ्या प्रमाणात मागणी वाढवल्याने आणि दुसरीकडे उत्पादनात कपात केल्याने कच्चा तेलाचे भाव वधारले. कच्चा तेलाने भरारी घेतल्यापासून अनेक देशांना उद्याची फिक्र पडली आहे. सोशल माध्यमातून तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) थेट 150 रुपये प्रति लिटरच्या घरात जाणार असल्याचा दावा ठोकण्यात येत आहे. खरंच असं होणार आहे का?

आज काय किंमत आज रविवारी, 9 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 80.70 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 85.12 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत.

काय आहे स्थिती ओपेक संघटनेने मार्च महिन्याचे बुलेटिन जाहीर केले आहे. त्यात मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यात जगभरातून कच्चा तेलाची मागणी घटल्याचा दावा करण्यात आला आहे. पहिल्या पंधरवाड्यात मागणी जास्त होती. पण या महिन्याच्या सुरुवातीला मागील महिन्याशी, मार्चशी तुलना करता 70,000 बॅरल प्रति दिवसाने कच्चा तेलाची मागणी वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात 101.28 दशलक्ष बॅरल प्रति दिवस तर दुसऱ्या आठवड्यात ही मागणी 100.77 दशलक्ष बॅरल प्रति दिवसांवर आली.

हे सुद्धा वाचा

चीनमध्ये मोठी मागणी जगात चीनसह अनेक देशात या वर्षात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. त्यामुळे या देशात निर्बंध आले होते. परिणामी कच्चा तेलाचे उत्पादन जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती होती. त्यामुळे अनेक देशाचा तेल साठा वाढला होता.

पेट्रोल-डिझेल 150 रुपयांच्या घरात जाणार? तर सोशल मीडियावर आतापासूनच पेट्रोल-डिझेल 150 रुपयांच्या घरात जाणार असल्याच्या बातम्यांनी धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेसह दोस्त राष्ट्रांनी नरमाईची भूमिका घेतल्यास आता असलेल्या दबावतंत्राला आळा बसू शकतो. तर रशियाने जर भारताला कमी किंमतीत इंधन पुरवठा केल्यास किंमतीत फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. जर तरच्या या गणितात कुठलाच तोडगा निघाला नाहीतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होईल. पण ती साधारणतः 10-12 रुपयांच्या घरात असेल.

उत्पादन घटवले

  1. ओपेक आणि रशियाचा कच्चा तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय
  2. 1 दशलक्ष कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल
  3. सौदी अरब प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करणार
  4. इराक प्रति दिवस 211,000 बॅरल कच्चा तेलाचे उत्पादन घटविणार
  5. संयुक्त अरब अमिरात 144,000 बॅरल प्रति दिवस कपात करणार
  6. कुवेत 128,000 बॅरल तर अल्गेरिया 48 हजार बॅरलचे उत्पादन घटविणार
  7. ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे.
  8. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.43 आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 94.74 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.68 तर डिझेल 93.20 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.83 रुपये आणि डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.85 आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.