Indian Currency : काय सांगता काय, जपानने छापल्या होत्या भारतीय नोटा! यामागील रोचक कहाणी काय

Indian Currency : विश्वास तर बसणार नाही, पण 80 वर्षांपूर्वी जपानने भारतीय नोटा छापल्या होत्या. फेक करन्सी नाही खराखुऱ्या नोटा छापल्या होत्या राजेहो...पण त्यामागची कहाणी मोठी रंजक आहे..

Indian Currency : काय सांगता काय, जपानने छापल्या होत्या भारतीय नोटा! यामागील रोचक कहाणी काय
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 7:16 PM

नवी दिल्ली : एके काळी जपानाने भारतीय नोटा छापल्या (Japan Printed Indian Notes) होत्या. भारतात बोगस नोटा पाठविण्याचे हे काही रॅकेट नव्हते. तर या नोटा खऱ्याच होत्या. जपानाने 5,10 आणि 100 रुपयांची छपाई केली होती. साधारणपणे ही गोष्ट 80 वर्षांपूर्वीची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यावेळी तर ब्रिटिशांचे राज्य होतं. मग जपानमध्ये नोटा छापण्याचे कारण तरी काय? आता अजून एक धक्का तुम्हाला बसेल, या नोटा भारतासाठी नाही तर त्यावेळच्या ब्रह्मदेशासाठी म्हणजेच आजच्या म्यानमारसाठी छापण्यात आल्या होत्या. जास्त गुंतागुंत न करता या मागील रंजक गोष्ट समजून घेऊयात..

दुसऱ्या विश्वयुद्धाशी संबंध तर त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरु होते. त्यावेळी ब्रह्मदेशावर ही भारतासारखे ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रम्हदेश पण ब्रिटिश वसाहत होती. युद्धावेळी जपान आणि इंग्रजांमध्ये वैर होते. इंग्लंड दोस्त सैन्यात होता. तर जपान, जर्मनी, इटली यांचा एक गट होता. जपानने 1939 मध्ये या विश्वयुद्धात उडी घेतली. त्यांनी 1942 मध्ये ब्रह्मदेशात मुसंडी मारली. इग्रंजाचं सैन्याची पिछेहाट झाली. 1944 पर्यंत मोठा भूभाग जपानच्या ताब्यात होता.

व्यवहार-व्यापारासाठी चलन या दोन वर्षात जपानला याभागातील व्यवहार, व्यापारासाठी, सामान्याच्या खरेदी-विक्रीसाठी चलनाची गरज भासली. ब्रह्मदेशावर इंग्रजांचं राज्य असल्याने तिथे भारतीय रुपयाचे प्रचलन होते. जपानने हा भाग ताब्यात घेतल्यानंतर तिथे एक तात्पुरते सरकार तयार केले. पण यापूर्वीचीच अर्थव्यवस्था त्यांनी कायम ठेवली. भारतीय रुपया पण बदलला नाही. त्यांनी जपानी चलन याठिकाणी आणले नाही. त्यांना ही बाब अव्यवहार्य वाटली.

हे सुद्धा वाचा

जपानने छापली भारतीय नोट जपानने ब्रह्मदेशातील चलनव्यवस्था कायम ठेवण्यासाठी 1942 मध्ये 1, 5 आणि 10 सेंट्स (पैसे) तर 1, 5 आणि 10 रुपयांच्या नोटा छापल्या. या नोटा जपानमध्ये छापण्यात आल्या आणि त्या ब्रह्मदेशात पाठविण्यात आल्या. 1944 मध्ये 100 रुपयांची नोट छापली. अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यावर जपानने 1945 मध्ये शस्त्र खाली ठेवले. या नोटावर B असे लिहिले होते. या B चा अर्थ ब्रह्मदेश असा होता. त्याकाळी जपानने प्रत्येक नोटेवर एक कोड छापला होता. हा कोड B होता.

कशी होती नोट प्रत्येक नोटेवर ‘Government of Great Imperial Japan’ असे लिहिलेले होते. याशिवाय जपानच्या अर्थ मंत्रालयाकडून एक चिन्ह पण छापण्यात येत होते.या नोटांवर बौद्ध धर्माची झलक दिसत होती. त्यावर मंदिरे किंवा बौद्ध मठांची चित्रेही छापलेली होती.

शरणागती नंतर मोल कसले 1945 मध्ये जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला. त्यानंतर जपानने शरणागती पत्करली. त्यानंतर दुसरे विश्वयुद्ध संपले. जपानने शरणागती पत्करली. त्यानंतर ब्रह्मदेशातील त्यांच्या नोटांना काहीच अर्थ उरला नाही. या नोटांचे मूल्य उरले नाही. पण या नोटांना सध्या मोठी मागणी आणि किंमत असल्याची चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.