MahaBank Loan News : आनंदी आनंद गडे! महाराष्ट्र बँकेची मान्सून ऑफर;कर्ज झाले स्वस्त, ग्राहकांची हप्त्यांवर होणार बचत

Loan Cheaper News : बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना मान्सून ऑफर दिली आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.35 टक्के कपात केली आहे.त्यामुळे कर्जाचे हप्ते कमी होतील

MahaBank Loan News : आनंदी आनंद गडे! महाराष्ट्र बँकेची मान्सून ऑफर;कर्ज झाले स्वस्त, ग्राहकांची हप्त्यांवर होणार बचत
कर्ज झाले स्वस्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 5:04 PM

BOM Loan News : बँक ऑफ महाराष्ट्राने (Bank Of Maharashtra) त्यांच्या ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. बँकेने ग्राहकांसाठी (Consumer) खास मान्सून ऑफर आणली आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.35 टक्के कपात केली आहे. या घाडमोडींची विंत्तबातमी महाबँकेने शेअर बाजाराला दिली. हे नवीन कर्ज दर 10 जुलै 2022 रोजीपासून प्रभावीपणे लागू होतील असे बँकेने शेअर बाजाराला (Share Market) कळविले आहे. 10 जुलै रोजी एमसीएलआरमध्ये सुधारणा केल्याचे कळविले. बँकेने सांगितले की, एक वर्षाच्या कालावधीत एमसीएलआरमध्ये 0.20 टक्क्यांची इतकी कपात  (Reduce) करण्यात आली आहे. सध्य एमसीएलआर हा 7.50 टक्के राहिल. यापूर्वी बँकेचा एमसीएलआर हा 7.70 टक्के होता. एमसीएलआर हा ग्राहकांच्या कर्जाचे दर ठरविण्याचा मापदंड आहे. या नवीन धोरणाचा बँकेच्या लाखो ग्राहकांना फायदा होईल. त्यामुळे कर्ज स्वस्त होईल आणि ग्राहकांचे कर्जाचे हप्ते कमी होईल. नवीन दर लगेच लागू झाल्याने त्याचा फायदा पुढच्या महिन्यापासून मिळू शकतो. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांचे हप्ते घटल्याने बचत होईल.

आरबीआय पुन्हा रेपो रेट वाढवण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया MPC दरांमध्ये वाढ करु शकते. कारण सध्या महागाई म्हणावी तशी कमी झाली नाही. उलट महागाई वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महागाईचा दर 7.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. केंद्रीय बँकेने पहिल्या तिमाहीत महागाई दर 7.5 टक्के, दुस-या तिमाहीत तो 7.4 टक्के तर तिस-या तिमाहीत महागाई दर 6.2 टक्के राहण्याची आणि चौथ्या तिमाहीत हा दर 5.8 टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

कर्जावर नवीन व्याजदर

  1. या निर्णयामुळे सहा महिन्यांसाठी एमसीएलआरमध्ये 0.20 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ती आता 7.40 टक्क्यांवर आली आहे. तर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हा दर 0.35 टक्के घसरून 7.20 टक्क्यांवर आला आहे.
  2. तर सहा महिने आणि एक वर्षांच्या कालावधीसाठी MCLR च्या बेसिस पॉईंट्समध्ये 20 टक्क्यांची कपात झाली आहे. या कालावधीसाठी एमसीएलआर घसरुन क्रमशः 7.40 आणि 7.50 टक्के झाला आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास तीन वर्षांच्या कालखंडानंतर रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटसची वाढ केली होती. आरबीआयने रेपो रेपटमध्ये 40 बेसिस पाईंट वाढवून 4.40 टक्के केला होता. त्यानंतर बँकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली. त्यामुळे हा दर 4.90 टक्क्यांवर पोहचला. महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने हा उपदव्याप केला होता.
  5. यापूर्वी इंडियन ओव्हरसीज बँकेने (Indian Overseas Bank) एमसीएलआर मध्ये 10 बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती.तसेच आयडीएफसी फर्स्ट बँकेने(IDFC First Bank) ही त्यांच्या विविध कर्ज कालावधीसाठी एमसीएलआर मध्ये वाढ केलेली आहे.
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.