Alert To Pensioners : निवृत्तीवेतनधारकांसाठी खूशखबर! 73 लाख पेन्शनधारक होणार मालामाल, काय EPFO ची योजना?

EPFO Pension News : भारतातील 73 लाख पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या महिनाअखेर सेवानिवृत्तीचा निधी पेन्शनधारकाच्या खात्यात एकाचवेळी जमा होण्याची शक्यता आहे.

Alert To Pensioners : निवृत्तीवेतनधारकांसाठी खूशखबर! 73 लाख पेन्शनधारक होणार मालामाल, काय EPFO ची योजना?
निवृत्तीवेतनधारकांसाठी खुशखबरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 3:43 PM

Alert To Pensioners : देशातील सेवानिवृत्ती वेतनधारकांना (Pensioners) आनंदाची बातमी आहे. त्यांच्या खात्यात लवकरच पैसा येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO) 29 आणि 30 जुलै रोजी होणार्‍या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करेल आणि त्याला मंजुरी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील 73 लाखांहून अधिक पेन्शनधारकांच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ची 138 हून अधिक प्रादेशिक कार्यालये लाभार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील स्वतंत्रपणे पेन्शन वितरित करतात. त्यामुळे विविध क्षेत्रीय कार्यालयातील पेन्शनधारकांना वेगवेगळ्या वेळी किंवा एखाद्या दिवसात पेन्शन (Pension) मिळते. देशातील 138 पेक्षा जास्त प्रादेशिक कार्यालयांच्या (Divisional Offices) केंद्रीय डेटाबेसचा वापर करून पेन्शनचे वितरण केले जाईल आणि यामुळे एकाच वेळी 73 लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभ जमा करणे सुलभ होणार आहे. याविषयीचा निर्णय या महिन्याच्या अखेरीस होणार आहे.

महिना अखेरीस बैठक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसंबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) आहे. केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन (central pension disbursal system) करण्याचा प्रस्ताव या सर्वोच्च संस्थेसमोर आहे. सीबीटी 29 आणि 30 जुलै रोजी होणार्‍या बैठकीत याविषयीचा निर्णय घेणार आहे. देशातील 138 पेक्षा जास्त प्रादेशिक कार्यालयांच्या केंद्रीय डेटाबेसचा वापर करून पेन्शनचे वितरण केले जाईल आणि यामुळे एकाच वेळी 73 लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभ जमा करणे सुलभ होईल, याविषयीची माहिती एका सूत्राने पीटीआयला (PTI)सांगितले. सध्या देशातील 138 पेक्षा जास्त प्रादेशिक कार्यालये त्यांच्या प्रदेशातील निवृत्तीवेतनधारकांना स्वतंत्रपणे सेवा देतात आणि म्हणूनच देशभरातील पेन्शनधारकांना वेगवेगळ्या वेळी किंवा वेगवेगळ्या दिवशी पेन्शन मिळते.

हे सुद्धा वाचा

या वेतनधारकांना ही फायदा

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, CBT सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी योगदान दिलेल्या वेतनधारकांना ही पेन्शन खात्यातून ठेवी काढण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर देखील विचार करु शकता आणि मंजूर करण्याची शक्यता आहे. सध्या, केवळ सहा महिने ते 10 वर्षे योगदान जमा केलेल्या सदस्यांना त्यांच्या पेन्शन खात्यातून पैसे काढण्यासाठी मूभा देण्यात आली आहे.

पीएफ खाते हस्तांतरणाची झंझट संपणार

केंद्रीकृत पद्धत लागू झाल्यानंतर ईपीएफओ नोंदणीकृत सदस्यांना सर्व फायदे एका छताखाली मिळतील. यामध्ये डी-डुप्लिकेशन बंद होईल आणि अनेक पीएफ खाते एकाच खात्यात विलीन करता येतील. त्यामुळे नोकरी बदलल्यावर खाते हस्तांतरणाची आवश्यकता राहणार नाही.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.