Bank Locker : लॉकरमधील दागिने किती सुरक्षित? जाणून घ्या काय सांगतो ‘आरबीआयचा’ नवा नियम

दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू चोरीला (stolen) जाऊ नयेत यासाठी अनेक जण बँकेच्या (Bank) लॉकरचा वापर करतात. मात्र, बँकांचे लॉकर फोडूनही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. जाणून घेऊयात अशा परिस्थितीमध्ये नेमके काय करावे?

Bank Locker : लॉकरमधील दागिने किती सुरक्षित? जाणून घ्या काय सांगतो 'आरबीआयचा' नवा नियम
सोन्याचा भाव घसरलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 2:10 AM

दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू चोरीला (stolen) जाऊ नयेत यासाठी अनेक जण बँकेच्या (Bank) लॉकरचा वापर करतात. मात्र, बँकांचे लॉकर फोडूनही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अशाच एका प्रकरणात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ला पीडित ग्राहकाला ऑगस्ट 2022 मध्ये 30 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण झारखंडमधील बोकारो स्टील शाखेशी संबंधित आहे. गोपाल प्रसाद नावाच्या व्यक्तीचे लॉकरमध्ये ठेवलेले सर्व दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी तब्बल पाच वर्ष कायदेशीर लढाई दिल्यानंतर गोपाल यांना न्याय मिळाला. बँक लॉकरमधून दागीने चोरी होण्याची ही घटना पहिली नाही. लॉकर तोडून चोरी होणे, सामान गायब होणे अशा घटना वारंवार आपल्या कानी येत असतात. परंतु अनेक वेळा बँक अशा घटना झाल्याचे नाकारतात. लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाची जबाबदारी बँकेची नाही असे सांगण्यात येते.हेच गोपाल यांनाही सांगण्यात आले होते. लॉकरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे बँकेला माहीत नसल्याने बँक ही जबाबदारी घेण्यास नाकारते. त्यामुळे ग्राहकांजवळ फक्त कायदेशीर लढाई लढण्याचा पर्याय राहतो.

बँकांना जबाबदारी झटकता येणार नाही

परंतु आता बँका अशा चोरीच्या घटना घडल्यास जबाबदारी झटकू शकत नाहीत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर RBI ने नवीन नियम जानेवारी 2022 पासून जारी केले आहेत. या नियमांनुसार आग लागणे, चोरी होणे, इमारत जळाल्यास किंवा कर्मचाऱ्यांनी घातपात केल्यास बँकेला लॉकरच्या वार्षिक शुल्काच्या 100 पट अधिक नुकसान भरून द्यावे लागणार आहे. RBI ने लॉकर व्यवस्थापनाबाबत देखील नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम लॉकर आणि बँकांजवळ असणाऱ्या वस्तूंची सेफ कस्टडी या दोन्हीवर लागू होतात. असे असतानादेखील लॉकरमधून सामान चोरी झाल्यास जबाबदारी घेण्यास कोणीही तयार होत नाही. कायदेशीर खर्च परवडत नसल्यानं अनेकजण न्यायालयात दाद मागत नाहीत.

आरबीआयकडून नवे दिशानिर्देश जारी

बँकांनी आपल्या लॉकरची सुरक्षा करणं गरजेचं आहे असे RBI नं स्पष्ट केलंय. बँकांच्या लॉकरचे स्ट्रॉंग रूम RBI च्या दिशानिर्देशानुसार तयार करण्यात येते. एखाद्या महामार्गावर अपघात झाल्यास कुणी वाहनं चालवणं थांबवत नाहीत त्याचप्रमाणे. लॉकरमधून चोरीची घटना घडली तर याचा अर्थ असा होत नाही की लॉकर असुरक्षित आहेत, असे बँकचे माजी अधिकारी सुरेश बंसल यांनी म्हटलं आहे. तसेच आरबीआयच्या निर्देशानुसार बँका सजग होतील आणि स्ट्रॉंगरूमची सुरक्षा अधिक मजबूत होईल, असा विश्वासही बंसल यांनी व्यक्त केला आहे.सध्या सर्वच बँका जोखमीचं काम करत असताना विमा काढतात. परंतु लॉकर विम्याची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीये. कोणत्याही बँकेजवळ लॉकरचा मालकी हक्क नसतो. लॉकरमध्ये एखाद्या व्यक्तीनं किती किंमतीचे सामान ठेवले आहे याची बँकेला कोणतीही कल्पना नसते. पण विमा हा एका निश्चित रक्कमेवर काढला जातो त्यानंतर भरपाई मिळते. त्यामुळेच बँका लॉकरमधील वस्तूंसाठी विमा काढू शकत नाहीत, अशी माहिती बंसल यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

काय काळजी घ्याल

एकूणच बँकच्या लॉकरमध्ये ठेवलेले सामान पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर लॉकरचा वापर करा. लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या दागिन्यांच्या पावत्या सांभाळून ठेवा. नवीन दागिने खरेदी केले असतील तर त्याच्या देखील पावत्या जपून ठेवा. जुने दागिने असतील तर त्याचे व्हॅल्यूएशन केल्यानंतरच दागिने लॉकरमध्ये ठेवावे. व्हॅल्यूएशनची पावती सांभाळून ठेवा. तुमच्या लॉकरचे नुकसान झाल्यास ही कागदपत्रे आणि पावत्या तुम्हाला भरपाई करून देण्यास फायदेशीर ठरतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.