Edible Oil : खाद्यतेल झाले पुन्हा स्वस्त! सर्वसामान्यांच्या आनंदाला फुटली उकळी, असा आहे भाव

Edible Oil : सणासुदीच्या हंगामात सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा एकदा आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. खाद्यतेल पुन्हा स्वस्त झाले आहे. गेल्या पंधरवाड्यात खाद्यतेलातच स्वस्ताईचे वारे वाहू लागले आहे. पण त्यासोबतच मोहरीच्या आणि पामतेलातील भेसळीच्या बातम्यांनी चिंताही वाढवली आहे. तेव्हा काळजी घ्या आणि सणाचा आनंद लुटा.

Edible Oil : खाद्यतेल झाले पुन्हा स्वस्त! सर्वसामान्यांच्या आनंदाला फुटली उकळी, असा आहे भाव
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 10:46 AM

नवी दिल्ली : परदेशी बाजारातील भावात सुधारणेनंतर भारतीय बाजारात खाद्यतेलाने पुन्हा एकदा आनंदाची पेरणी केली आहे. गुरुवारी तेल-तेलबियाच्या (Edible Oil) किंमतीत मोठी तफावत दिसून आली. खाद्यतेलाच्या भावात घसरण झाली. खाद्यतेलाच्या स्वस्ताईमुळे ग्राहकांच्या आनंदाला उकळ्या फुटल्या. शेंगदाणा आणि तिळाच्या तेलाचा ताठा मात्र अद्याप कायम आहे. बाजारात या तेलाच्या किंमती जास्त आहे. पण इतर सर्वच खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण आली आहे. परदेशी बाजारातील (Foreign Market) भावात झालेली सुधारणा यासाठी कारणीभूत मानण्यात येते. मोहरी, सोयाबीन, कच्चे पामतेल, पोमोलीन, सूर्यफूल, सरकी यासह सर्वच खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत.

गेल्या पंधरवाड्यात खाद्यतेलातच स्वस्ताईचे वारे वाहू लागले आहे. पण त्यासोबतच मोहरीच्या आणि पामतेलातील भेसळीच्या बातम्यांनी चिंताही वाढवली आहे. काही प्रमुख खाद्यतेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्यांनी गेल्या आठवड्याभरात सर्वांचीच चिंता वाढवली आहे. त्यामुळे खाद्यतेल खरेदी करताना त्याची खात्री करुन घ्या. तेलाच्या किंमती स्वस्त होत असताना काही व्यापारी भेसळ करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी भेसळयुक्त खाद्यतेलाची तक्रार करणे गरजेचे आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तेल, तेलबियांच्या उत्पादन वाढले आहेत. परदेशी बाजारातील किंमतीतही सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांनी आता भावात बदल करणे आवश्यक आहे. त्यांनी भावात सुधारणा करणे आवश्यक आहे. या कंपन्यांनी आता बाजारात तेलाची विक्री करताना नवीन भावाने खाद्यतेल विक्री करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारनेच भावांच्या ताज्या दराविषयीचे पोर्टल सुरु करावेत आणि भारतात खाद्यतेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्यावर त्यांचे रोजचे अद्ययावत भाव जाहीर करावेत, अशी मागणी ही जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा

शुल्क मुक्त आयात धोरणाचा देशातील तेल उत्पादन आणि तेलबियांच्या भावांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे देशी बाजारापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांकडील सोयाबीन, मोहरी, शेंगदाणे, कपाशी यांची योग्य भावाने, किमान आधारभूत किंमतींवर जर विक्री झाली नाही तर शेतकरी तेलबियांच्या उत्पादनाकडे पाठ फिरवतील आणि भविष्यात मोठे संकट उभे ठाकेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

खाद्यतेल-तेलबियांचे भाव काय

  1. मोहरी तेलबिया – रु. 5,360-5,410 (42 टक्के स्थिती दर) प्रति क्विंटल
  2. भुईमूग – 6,825-6,885 रुपये प्रति क्विंटल
  3. शेंगदाणा तेल गिरणी वितरण (गुजरात) – रुपये 16,700 प्रति क्विंटल
  4. शेंगदाणा रिफाइंड तेल 2,560-2,825 रुपये प्रति टिन
  5. मोहरीचे तेल दादरी – 11,140 रुपये प्रति क्विंटल
  6. मोहरी पक्की घणी – रु. 1,760-1,790 प्रति टिन
  7. मोहरी कच्ची घणी – रु. 1,720-1,845 प्रति टिन
  8. तीळ तेल गिरणी वितरण – रु. 18,900-21,000 प्रति क्विंटल
  9. सोयाबीन ऑइल मिल डिलिव्हरी दिल्ली – रुपये 11,800 प्रति क्विंटल
  10. सोयाबीन मिल डिलिव्हरी इंदूर – रु. 11,450 प्रति क्विंटल
  11. सोयाबीन तेल देगम, कांडला – 11,110 रुपये प्रति क्विंटल
  12. सीपीओ एक्स-कांडला – 9,000 रुपये प्रति क्विंटल
  13. कपाशीचे बियाणे मिल डिलिव्हरी (हरियाणा) – 9,920 रुपये प्रति क्विंटल
  14. पामोलिन आरबीडी, दिल्ली – 10,470 रुपये प्रति क्विंटल
  15. पामोलिन एक्स- कांडला – रु 9,520 (जीएसटी शिवाय) प्रति क्विंटल
  16. सोयाबीनचे धान्य – रु. 5,280-5,410 प्रति क्विंटल
  17. सोयाबीन लूज – रु 5,020-5,040 प्रति क्विंटल

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.