Russia India Oil : मोदी यांचा मास्टरस्ट्रोक! अमेरिकेच्या आणले नाकीनऊ, सुपरपॉवरला दिवसाच दाखवले तारे

Russia India Oil : रशिया-युक्रेन युद्धानंतर जग दोन गटात विभागल्या गेल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पश्चिमी देशांनी रशियावर प्रतिबंध लादले आहेत. तर भारत आणि चीन रशियाच्या पाठिशी आहेत. या नव्या समिकरणामुळे डॉलरला जागतिक पातळीवर मोठा फटका बसत आहे. त्यातच रुपयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर एंट्री केल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे.

Russia India Oil : मोदी यांचा मास्टरस्ट्रोक! अमेरिकेच्या आणले नाकीनऊ, सुपरपॉवरला दिवसाच दाखवले तारे
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 9:21 AM

नवी दिल्ली : युक्रेन युद्धानंतर अमेरिका (America) सातत्याने भारतावर दबाव टाकत आहे. पण भारताने रशियाची साथ सोडलेली नाही. रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia-Ukraine War) जग दोन गटात विभागल्या गेल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पश्चिमी देशांनी रशियावर प्रतिबंध लादले आहेत. तर भारत आणि चीन रशियाच्या पाठिशी आहेत. भारताने तर रशियाकडून कच्चे तेल आयातीचा धडाकाच लावला. अमेरिकन कच्चा तेलाची आयात कमी करत भारताने रशियाच्या कच्चा तेलाला प्राधान्य दिले आहे. या नव्या समिकरणामुळे डॉलरला जागतिक पातळीवर मोठा फटका बसत आहे. त्यातच रुपयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर एंट्री केल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) या मास्टरस्ट्रोकमुळे अमेरिकेच्या कच्चा तेलापासून डॉलरपर्यंत सर्वांसमोरच आव्हान उभे ठाकले आहे.

आता हे समिकरण काय आहे आणि त्याचा अमेरिकेला कसा फटका बसत आहे, ते समजून घेऊयात. भारताने गेल्या एका वर्षात सातत्याने रशियासोबत व्यापार वाढवला आहे. रशियाकडून 2 डॉलर प्रति बॅरलने स्वस्तात कच्चे इंधन खरेदी सुरु आहे. अमेरिकेच्या इंधन निर्यातीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्याची भारत ही हक्काची बाजारपेठ धोक्यात आली आहे. हा धोका एवढ्यावरच थांबला नाही. रशिया-भारताचा व्यापार डॉलरमध्ये होत नाही. तर तिसऱ्याच चलनात होत आहे. त्यामुळे डॉलरच्या मक्तेदारीलाही फटका बसला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, अमेरिकन रशियावर प्रतिबंध लावल्याने डॉलरच्या मक्तेदारीला आव्हान मिळाले आहे. गेल्या काही दशकांपासून भारत डॉलरच्या माध्यमातून कच्चे तेल खरेदी करत आहे. जगातील व्यापार डॉलरमध्येच होतो. ते प्रचलित आणि सर्वमान्य जागतिक चलन आहे. पण मोदींनी डॉलरला पर्याय उभा केला आहे. रशियाकडून तेल खरेदी करताना वा इतर व्यापार करताना डॉलरचा वापर करण्यात येत नाही. त्याऐवजी, रुबल, रुपया आणि दिरहमचा वापर वाढला आहे. त्याचा मोठा फटका डॉलरला बसला आहे.

हे सुद्धा वाचा

रुपया, रुबल अथवा संयुक्त अरब अमिरातचे चलन दिरहम यांच्या माध्यमातून जागतिक व्यापार करण्यावर भारताने भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताने कोट्यवधींचा व्यापार केला आहे. हा सर्व व्यापार डॉलरला वगळून करण्यात आला आहे. भारताच्या या भूमिकेविषयी फारसे कुणालाच माहिती नव्हते. पण आता उघडपणे ही डील होत आहे. त्यातच भारताने रुपयालाही जागतिक पातळीवर मंच मिळवून देण्यासाठी धडपड सुरु केली आहे. अनेक देशांनी रुपयात रुची दाखवली आहे. अनेक देश रुपयात व्यापार करण्यास उत्सूक आहेत.

भारतीय सरकारी वृत्तसंस्था पीटीआयने विषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 49 देशांनी भारतीय रुपयात व्यवहार करण्यासाठी खाते उघडली आहेत. तर इतर अनेक देशांना परवानगीची प्रतिक्षा आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे. या खात्यांचा उद्देश रुपयाच्या माध्यमातून परदेशी व्यापार वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. भारतात 49 देशांनी वोस्ट्रो खाते उघडले, त्यात रशिया, मॉरीशस, श्रीलंका, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, इजराईल आणि जर्मनी येथील बँकाचा समावेश आहे. हे देश आता रुपयात व्यवहार करत आहेत.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रुपयाविषयीची महत्वकांक्षी योजना सुरु केली होती. ज्या देशात अमेरिकन डॉलरची गंगाजळी कमी आहे. अशा देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी भारतीय रुपयांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे या देशांना भारतीय रुपयांमध्ये व्यापारी सौदे आणि व्यवहार पूर्ण करता येतील, सेटलमेंट पूर्ण करता येईल.

या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीलाच RBI ने आतापर्यंत 18 वास्त्रो खाते (Vostro Accounts) सुरु केली आहेत. यामध्ये रशियासाठी 12, श्रीलंकेसाठी 5 तर मॉरिशससाठी 1 खात्याचा समावेश आहे. या तीन देशांमध्ये भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरता येणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.