Ethanol Fueled Car : केवळ इथेनॉलवर धावणार कार! नितीन गडकरी यांनी केली नवीन कार लाँच

Ethanol Fueled Car : भारतीय ग्राहकांना आता इंधनाचा आणखी एक पर्यायच मिळाला नाही तर त्यावरील एक नवीन कार पण मिळाली. 100 टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारचे लाँचिंग केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. विविध सेगमेंटमध्ये ही कार उपलब्ध झाल्यास ग्राहकांच्या उड्या पडतील.

Ethanol Fueled Car : केवळ इथेनॉलवर धावणार कार! नितीन गडकरी यांनी केली नवीन कार लाँच
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 12:54 PM

नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : पेट्रोल आणि डिझेलवरील निर्भरता कमी करण्यासाठी भारतात गेल्या काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरु आहे. ईव्ही मार्केटला चालना देण्यासाठी सबसिडीपासून अनेक गोष्टींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यापूर्वी हायड्रोजन कारची चर्चा सुरु होती. पण त्यात इथेनॉलचा (Ethanol Fuel) पर्याय समोर ठेवण्यात आला. ब्राझीलने या बाबतीत क्रांती केली आहे. जैविक इंधनावर या देशात जवळपास 93 टक्के वाहनं धावतात. इंजिनामध्ये त्यादृष्टीने बदल करण्यात आला आहे. आज, 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 100 टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारचे लाँचिंग केले. टोयोटो इनोव्हा हायक्रॉस असं या कारचे नावं आहे. BS6 स्टेज-2 मानांकनानुसार ही कार तयार करण्यात आली आहे. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार (Electrified Flex fuel Car) आहे.

काय आहे वैशिष्ट्ये

  1. ही कार पूर्णपणे इथेनॉलवर धावेल
  2. कार स्वतःच इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करेल, EV मोडवर पण वापरता येईल
  3. हे सुद्धा वाचा
  4. कारमध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे
  5. इथेनॉलसह हायब्रिड प्रणालीवर 40 टक्के वीज निर्मिती करेल
  6. ही कार जगातील पहिली BS6 फेज-2 इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार
  7. यापूर्वी टोयोटा मिराई या हायड्रोजन कार सुद्धा लाँच

पेट्रोल अवघ्या 15 रुपयांना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल अवघ्या 15 रुपयांना मिळेल, असा दावा करुन खळबळ उडवून दिली होती. जवळपास दोन महिन्यांपूर्वी 5 जुलै रोजी त्यांनी हा दावा केला होता. राजस्थानमधील प्रतापगडमध्ये नितीन गडकरी यांनी पेट्रोल स्वस्ताईचे गणित समजून सांगितले होते. वाहनांमध्ये 60% इथेनॉल आणि 40% विजेचा वापर झाल्यास देशात पेट्रोलचा वापर कमी होईल. पेट्रोल केवळ 15 रुपये लिटर दराने मिळेल असा दावा त्यांनी केला होता. यामुळे देशात प्रदुषण घटेल, हे ओघाने आलेच.

सर्वाधिक इथेनॉलचा वापर कुठे

जगात ब्राझीलमध्ये सर्वाधिक इथेनॉलचा वापर करण्यात येतो. फ्लेक्स फ्युएलचा तिथे वापर होतो. पेट्रोल-डिझेल यांना पर्याय म्हणून अनेक वर्षांपूर्वी इथेनॉलचा वापर सुरु झाला. जैविक इंधनावर या देशात जवळपास 93 टक्के वाहनं धावतात. इंजिनामध्ये त्यादृष्टीने बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या देशात पेट्रोल-डिझेलची आयात कमी होते.

असे तयार होते इथेनॉल

स्टार्च आणि साखरेच्या किण्वातून इथेनॉल तयार होते. हे एक प्रकारचे अल्कोहोल असते. पेट्रोलमध्ये मिसळून ते वापरण्यात येते. ऊसाच्या रसापासून, मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला, स्टार्चयुक्त पदार्थातून इथेनॉल तयार करण्यात येते.

शेतकऱ्यांना झाला इतका फायदा

पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळून 41,500 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन वाचविण्यात आले. हरित वायू उत्सर्जनात 27 लाख टनांनी घट झाली असून शेतकऱ्यांना 40,600 कोटींचा फायदा झाला आहे. आता 20% इथेनॉल मिश्रणासह पेट्रोलच्या पुरवठ्यामुळे वार्षिक 4 अब्ज डॉलर वाचण्याचा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.