Jobs : तरुणांसाठी आनंदवार्ता! या सेक्टरमध्ये येणार लाट, इतक्या लाख नोकऱ्या मिळणार

Jobs : सध्या अनेक क्षेत्रात रोजगार मिळण्याची शक्यता आहे. पण या सेक्टरमध्ये बुमिंग दिसत आहे. तरुणांना येत्या काही दिवसांत नोकऱ्या मिळतील. तज्ज्ञांच्या मते, पुढील 9 महिन्यात एक लाखांहून अधिक लोकांना नोकरी मिळू शकते. नोकऱ्या देण्यात हे सेक्टर अग्रेसर असेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

Jobs : तरुणांसाठी आनंदवार्ता! या सेक्टरमध्ये येणार लाट, इतक्या लाख नोकऱ्या मिळणार
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 12:56 PM

नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : हॉस्पिटॅलिटी सेक्टर (Hospitality Sector) सध्या सर्वात बुमिंग ठरले आहे. 15 ऑगस्टच्या आठवड्यात या सेक्टरमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली. या सेक्टरमध्ये मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञ वर्तवत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जॉब ऑफर्स सुरु झाल्याने हा अंदाज समोर आला आहे. सध्या हॉस्पिटॅलिटीमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. तर विस्तार योजना पण सुरु आहे. अनेक स्टार्टअप, नवीन कंपन्यांना (Startups, Companies) तरुणांची आवश्यकता आहे. यामध्ये सर्वाधिक कर्मचारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या स्टार्टअपला लागणार आहेत. चहापासून तर विविध परदेशी खाद्यपदार्थांचे स्टार्टअप अनेक छोट्या-मोठ्या शहरात उघडल्या गेले आहेत. त्यांना विस्तारासाठी आता कर्मचारी वर्ग हवा आहे. क्रिकेट वर्ल्डकप, विविध सण आणि इतर अनेक इव्हेंटची रेलचेल असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी लागणार आहे. एका अंदाजानुसार, पुढील 9 महिन्यात एक लाखांहून अधिक लोकांना रोजगार(Jobs, Employment) मिळू शकतो.

सेक्टरमध्ये तेजी

भारतीय उद्योग परिसंघाने (CII) याविषयीची माहिती दिली. टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी स्किल काऊन्सिलचे सीईओ राजन बहादूर यांनी डेटा एनालिसीस सुरु असल्याचे सांगितले. त्यानुसार, कोविडच्या तिसऱ्या लाटेनंतर या क्षेत्रात मोठा रोजगार मिळणे आवश्यक होते. पण तितका प्रतिसाद मिळाला नाही. पण आता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

सणासुदीत बुकिंगमध्ये वाढ

आता सणासुदीचा काळ सुरु होत आहे. अनेक मोठे सण येणार असल्याने त्याची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटचे बुकिंग पण आतापासूनच सुरु झाले आहे. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असेल. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये अनुभवी आणि फ्रेशर या दोघांची पण गरज भासेल. त्यादृष्टीने तरुणांना या सेक्टरमध्ये रोजगार उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

दहा लाख नोकऱ्यांचा पाऊस

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे प्रमुख प्रणव रुंगटा यांनी नोकऱ्यांचा पाऊस पडणार असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, येत्या तीन महिन्यात या सेक्टरमध्ये दहा लाख जणांना रोजगार मिळू शकतो. सध्या या सेक्टरमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. या इंडस्ट्रीमध्ये विस्तार होत आहे. अनेक स्टार्टअप्स येत आहेत. त्यामुळे अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळू शकतो. या सेक्टरमध्ये बुमिंग येणार असल्याने तरुणांनी तयार असावे. या क्षेत्रातील अनुभवावर तरुणांचा स्वतःचा पण व्यवसाय करण्याची संधी मिळते. तसेच या व्यवसायासाठी एकदम मोठे भांडवल लागत नाही.  चांगली चव, कल्पकता आणि सेवा हा व्यवसायाचा पाया असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.