शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर ते तडक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले.
शिंदे सरकारमधील खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आजच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचं खातं वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या खाते वाटपात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाकडील दोन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत.
हाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण असणार? याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 वर्षाच्या चिमुकल्याला मदत केली आहे. या चिमुकल्याला जन्मत: हात नाहीत. पण हा चिमुकला आपल्या पायाच्या बोटांनी लिहितो. त्याने मुख्यमंत्र्यांसमोर आपलं पूर्ण नाव कागदावर लिहून दाखवलं. हे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भारावले.
राज्यात नवीन समीकरणे आकाराला आली आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत नेमके निर्णय काय होतात? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
State Cabinet Expansion : 'या' आमदारांचं मंत्रिपद निश्चित; राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत टीव्ही 9 मराठीची एक्सक्ल्युझिव्ह बातमी
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या नजरा विस्ताराकडे लागल्यात. नेमके कोण मंत्री होऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं 'लोक माझे सांगाती' हे राजकीय आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.
"आपल्याच राज्यातीलचं नाही तर जगभरातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या खाली जिलेटीनच्या काड्या ठेवल्या जातात. मुंबई असुरक्षित असल्यासारखं त्यांना वाटू लागतं. तुम्ही कायदा-व्यवस्थेवर आमच्यावर काय बोलणार?", असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
"तुम्ही गीतकार जावेद अख्तर यांचे पाकिस्तानमधील स्टेटमेंट ऐकणे गरजेचे आहे. तुम्ही आमच्या लता मंगेशकर यांना मानत नाहीत तर आम्ही का तुमच्या कलाकारांना मानू?", असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 30 जागांवर फटका बसला होता. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी त्याची कबुली दिली.