मी कधीही खालच्या भाषेत टीका केली नाही. मी माझ्या पक्षाकडून विकासाचे बोलतो. मुद्द्याचं बोलतो. आजच्या संपादकीयमध्ये कुठे खालच्या भाषेत वाक्य आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याने ही टीका करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे सुतोवाचच केलं आहे. अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आता नव्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीत डावललं जात असल्याच्या चर्चा सुरु असताना शिवतारे यांनी या चर्चांना आणखी खतपाणी घालणारं वक्तव्य केलं आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यांमध्ये पोहोचला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. पण तानाजी सावंत यांनी काळजी करण्याचं कारण नाही. तरीही सावधगिरी बाळगण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
Uddhav Thackeray Malegoan Sabha : उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा झाली. त्यांच्याबरोबर गद्दार नव्हते का? वारंवार गद्दार म्हणायचे जे लोक दुसरा पक्ष सोडून गेलेले आहे ते गद्दार नाही का?, असा प्रश्न नरेश मस्के यांनी उपस्थित केलेला आहे. पाहा...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे. या दोन बड्या नेत्यांमध्ये नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
वंचित आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय झालं पाहा...
काही दिवसांपूर्वी राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर शासक नसल्याचा दावा केला होता. त्यावरून भाजपने आव्हाड यांना घेरलं होतं.
राज ठाकरे यांना जेव्हा मी विरोध केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. लोकांमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड आक्रोस होता. त्यामुळे मी त्यांना विरोध केला होता.
ज्यांनी खासगी बँक बुडविली त्यांना तुम्ही एसटी महामंडळाच्या बँकेत आणले. तुमच्या काळातले एक-एक किस्से बाहेर काढले तर रडतानासुद्धा घरात उशीत तोंड घालून रडावे लागेल, असा इशाराचं गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
बाळासाहेबांनी आयुष्यभर शरद पवारांशी मैत्री केली, पण राजकीय सोयरीक केली नाही. बाळासाहेबांना पुढचं भविष्य माहीत होतं. त्याच पवारांनी नंतर एका दगडात दोन पक्षी मारले.