संयुक्त राष्ट्राकडून चॅम्पियन ऑफ द अर्थ म्हणून गौरव, कोण आहे मुंबईचा हा स्वच्छता क्रांती करणारा दूत
स्वच्छचा मोहिम अनेक जण सुरु करतात पण त्याला ध्येय खूप कमी जण बनवतात. मुंबईचा हा तरुण ज्याने मुंबईचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा विडा उचलला आणि जगाला प्रेरित केले.
My India My Life Goal : मुंबईतील एक समुद्रप्रेमी जो हुद्द्याने वकील आहे, त्याने वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील 5 दशलक्ष किलो कचरा साफ करण्याची जबाबदारी घेतली. 2015 मध्ये हे मिशन सुरू झाले नंतर नागरिकांमध्ये सर्वात मोठी स्वच्छता क्रांती झाली आणि जगातील सर्वात मोठे समुद्रकिनारा स्वच्छता मिशन हे चळवळीत रूपांतरित झाले. ज्याने जगभरातील लोकांना त्यांच्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ करण्यासाठी प्रेरित केले. 5 दशलक्ष किलो कचरा साफ करण्यासाठी 85 आठवडे लागले. 2016 मध्ये, मुंबईच्या वर्सोवा बीचच्या साफसफाईचे नेतृत्व केल्याबद्दल शाह यांना संयुक्त राष्ट्र संघाने चॅम्पियन ऑफ द अर्थ म्हणून नाव दिले. मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या अफरोज शाहच्या प्रयत्नातून प्रेरित होऊन, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाने जागतिक स्तरावर स्वच्छ समुद्र मोहीम सुरू केली.
28 मे 2017 रोजी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या शाह यांच्या कार्याचे कौतुक केले.