My india my life Goal : पर्यावरण वाचवण्यासाठी उचलला विडा, भारत-पाकिस्तान सीमेवर लावली झाडे
एकीकडे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असताना काश्मीरच्या इक्बाल लोन यांनी मात्र पर्यावरण वाचवण्यासाठी विडा उचलला आहे.
My India My Life Goal : काश्मीरला ( Kashmir ) धरतीवरचं स्वर्ग म्हटले जाते. काश्मीरमधील पर्यावरणामुळे त्याला महत्त्व आहे. पण या पर्यावरणाचं रक्षण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा येथे देखील लोकांना आनंद घेता येणार नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे खूप महत्त्वाची आहेत. भारत पाकिस्तान सीमेवर गेल्या अनेक वर्षापासून मोहम्मद इकबाल लोन ( Mohammad Iqbal Lone ) हे मोठ्या प्रमाणात झाडे लावत आहेत. काश्मीरचे सौंदर्य वाढवण्यासाठी ते काम करत आहेत.
काश्मीरमधील सौंदर्य कमी होऊ नये म्हणून मोहम्मद इकबाल लोन यांनी विडाच उचलला आहे. इकबाल लोन म्हणतात की, पाणी, जंगल आणि जमीन या शिवाय जीवन अपूर्ण आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे यावर्षात आपण अधिक झाडे लावली पाहिजेत. इकबाल लोन हे जम्मू काश्मीरच्या उरी येथील राहणारे आहेत. ते कश्मीरचे पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा जीवन परिचय देणारा हा व्हिडिओ