PPF Scheme : पीपीएफमध्ये एवढी करता येईल गुंतवणूक, काय होईल फायदा, जाणून घ्या अपडेट
PPF Scheme : पीपीएफमध्ये एवढी गुंतवणूक करता येते, त्यातून हमखास परतावा मिळू शकतो.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने अनेक बचत योजना (Investment Scheme) सुरु आहेत. या बचत योजनेत मोठी रक्कम जमा होते. त्यावर जोरदार व्याज मिळते आणि कर सवलतही मिळते. केंद्र सरकारच्यावतीने (Central Government) कर सवलतीच्या काही योजना राबविण्यात येतात. पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेत (PPF Scheme) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. या योजनेत मोठ्या रक्कमेची बचत होते. त्यावर हमखास मोठा परतावा मिळतो. म्युच्युअल फंड अथवा शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते. या गुंतवणुकीवर परतावा जोरदार मिळू शकतो, पण त्यासाठी अभ्यास आणि तज्ज्ञांची गरज असते. पीपीएफ योजनेचे फायदे जाणून घेऊयात.
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीत (PPF Scheme) मोठी रक्कम बचत करता येते. या योजनेत गुंतवणूकदाराला कर सवलतीचा फायदा मिळतो. ही सरकारी योजना असल्याने यातील रक्कम डुबण्याची वा फसविण्याची कुठलीही भीती नसते.
पीपीएफ योजनेवर सध्या केंद्र सरकार 7.1 टक्के वार्षिक व्याज देते. या योजनेत दीर्घकालीन अवधीसाठी गुंतवणूक करता येते. दीर्घकालीन गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. त्यांना कर सवलत मिळत असल्याने एकाच गुंतवणुकीवर डबल फायदा होतो.
पीपीएफ योजनेत गुंतवणूकदार 15 वर्षांकरीता गुंतवणूक करु शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्याची एक मर्यादा आहे. ही मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पीपीएफ योजनेत गुंतवणूकदाराला एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात सध्या 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. सध्या या गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज मिळेल. तसेच गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन म्युच्युरिटी योजना आहे. या योजनेतून तुम्हाला मुलीच्या शिक्षणाची, लग्नाची तरतूद करता येते. या योजनेत वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळते. या योजनेत अल्प बचत योजना एफडी (FD), आरडी (RD), एनएससी (NSC) आणि पीपीएफ (PPF) पेक्षा जास्त परतावा मिळतो.
या योजनेत जोखीम नसल्याने तुम्हाला त्याचा सर्वाधिक फायदा होतो. तुम्हाला तुमच्या रक्कमेची हमी मिळते. त्यावर व्याज मिळते. सध्या त्याचा व्याजदर ही जास्त आहे. पोस्ट खात्यातील योजना असल्याने त्यात 100 टक्के सुरक्षेची हमी मिळते.
सुकन्या समृद्धी योजना ही करमुक्त योजना आहे. या योजनेत EEE म्हणजे तीन वेगवेगळ्या स्तरावर कर सवलत मिळते. पहिली सवलत आयकर कायदा कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. रिटर्नवर कर लागत नाही. तसेच मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या एकूण रक्कमेवरही कर सवलत मिळते.