Health Insurance : वजन घटवा, स्वस्तात विमा मिळवा!

Health Insurance : आरोग्य विमा आता अधिक फायदेशीर ठरणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला घाम गाळावा लागेल. तुम्ही जितके फिट राहाल, तेवढा तुमचा अधिक फायदा होईल. कसं ते पाहा..

Health Insurance : वजन घटवा, स्वस्तात विमा मिळवा!
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 4:29 PM

नवी दिल्ली : आरोग्य विमा (Health Insurance) नव्हता इतका आकर्षक झाला आहे. आता अधिक फायदेशीर झाला आहे. पण हा फायदा पदरात पाडून घेण्यासाठी तुम्हाला कसरत करावी लागणार आहे. घाम गाळावा लागणार आहे. जेवढा जास्त तुम्ही घाम गाळाल, तेवढा तुमचा अधिक फायदा होईल. जेवढे तुम्ही फिट राहाल, तेवढा तुमचा आरोग्य विम्याचा हप्ता कमी होईल. विमा विक्री करताना कंपन्या वय, जुनी मेडिकल हिस्ट्री, बॉडी मास इंडेक्स (BMI), व्यसन आदी गोष्टींचा विचार करते. त्याआधारे विम्याचा हप्ता निश्चित होतो. तुम्ही व्यायाम कराल, तर फिट राहाल आणि त्यावरच तुमचा प्रीमियम (Insurance Premium) किती राहिल हे कंपन्या ठरवणार आहे..

लठ्ठपणा कसा मोजता लठ्ठपणा मोजण्यासाठी बॉडी मास इंडेक्स म्हणजे BMI मानक मानल्या जाते. शरीराचे वजन, उंचीच्या प्रमाणात किती आहे, याचे गणित BMI निश्चित करते. जर BMI 18.5 ते 24.9 या दरम्यान असेल तर वजन सर्वसाधारण असते. वजन 18.5 पेक्षा कमी असेल तर BMI नुसार, वजन नियंत्रणात आहे. तर BMI 25 ते 29.9 दरम्यान असेल तर याचा अर्थ तुमचे वजन जास्त आहे. BMI 30 पेक्षा अधिक असेल तर याचा अर्थ तुम्ही लठ्ठ आहात. BMI गणकाने, कॅलसीने तुम्ही ऑनलाईन ही तुमचा BMI स्कोअर जाणून घेऊ शकता.

लठ्ठ व्यक्तीकडून जास्त प्रीमियम इन्शुरन्स कंपन्या लठ्ठ व्यक्तीकडून अधिक हप्ता घेतात. ज्यांचे वजन जास्त ते लठ्ठपणाचे शिकार असतात. त्यामुळे त्यांना हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या व इतर आजार जडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या ग्राहकांकडून आरोग्य विमा दावा करण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे विमा कंपन्या अशा ग्राहकांकडून अधिकचा विमा घेतात.

हे सुद्धा वाचा

कंपन्यांची नामी युक्ती फिनटेक कंपनी पॉलिसी बाजारने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, विमा कंपन्या ग्राहकांना आता फिटनेस बाबत जागरुक करण्यासाठी खास योजना चालवत आहे. ग्राहकाने फिटनेसकडे लक्ष द्यावे यासाठी कंपन्या सवलत, सूट देत आहेत. तुमचा बॉडी मास इंडेक्स जेवढा सुधारेल, तेवढा फायदा जास्त होईल. प्रीमियममध्ये सवलत मिळेल.

इतकी मिळेल सवलत तुम्ही अधिक मेहनत घेतली, व्यायाम केला तर फायदा होईल. पुढील वर्षीच्या प्रीमियममध्ये ग्राहकांना 10 ते 30 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. काही विमा कंपन्यांनी तर थेट 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची योजना आखली आहे. प्राप्तिकर कायद्याच्या नियम 80(D) अंतर्गत एखादी व्यक्ती स्वतः सह पत्नी आणि मुलांचा आरोग्य विमा घेत असेल तर 25,000 रुपयांपर्यंत करपात्र सूट मिळते.

नवीन फिचर्स जोडले फिटनेस वाढविण्यासाठी आरोग्य विमा कंपन्या नवीन फिचर्स जोडत आहेत. त्यामुळे अनेकांना फिटनेसची गोडी लागेल. ग्राहक जेवढा फिट राहील. व्यायाम करेल, कसरत करेल, आरोग्य जपेल तेवढा त्याला रिवॉर्ड पॉईंट्स देण्यात येतील. याशिवाय त्याला डिस्काऊंट कूपण, हेल्थ चेकअप आणि डायग्नोसिस सह इतर अनेक फायदे मिळतील.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.