Pan-Aadhaar Link : उंदड झाली आधार-पॅनकार्ड जोडणी! या आकड्यांनी वाढवला हुरुप

Pan-Aadhaar Link : आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. केंद्र सरकारचे हे इंजेक्शन कमालीचे प्रभावशाली ठरले. अनेक नागरिकांनी या दोन्ही कार्डची जोडणी केली आहे.

Pan-Aadhaar Link : उंदड झाली आधार-पॅनकार्ड जोडणी! या आकड्यांनी वाढवला हुरुप
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 9:15 PM

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडणी कधीच अनिवार्य केली होती. पण केंद्र सरकारने वेळोवेळी त्यात मुदत वाढ दिली. पण गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने कडक पाऊल उचलले. केंद्राने विलंब शुल्क आणि दंड वसूली सुरु केली. त्याचा लागलीच परिणाम दिसून आला. अनेक नागरिकांनी या दोन्ही कार्डची (Aadhaar Card-Pan Card Linking) जोडणी केली. पण अजूनही अनेक नागरिकांनी आधार कार्ड आणि पॅन कार्डची लिकिंग केलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात पुन्हा नागरिकांना मुदतवाढीची सवलत देण्यात आली. आता जून महिन्यापर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर नागरिकांसमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल.

आता संधी नाही आयकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम तारीख केली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाही. कारण यासर्व व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो. यानंतर नागरिकांना संधी देण्यात येणार नाही.

तर पॅन कार्ड निष्क्रिय 30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे ज्यांना हे दोन्ही कार्ड जोडायचे आहे, त्यांना सध्याची रक्कम भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

हे सुद्धा वाचा

उदंड प्रतिसाद केंद्र सरकारने यापूर्वी अनेकदा नागरिकांना संधी दिली. त्यानंतर गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारने दोन्ही कार्ड जोडणीसाठी 500 रुपये शुल्क आकारले. तर जुलै महिन्यानंतर हे शुल्क एक हजार रुपये करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 51 कोटींहून अधिक नागरिकांनी पॅनकार्ड-आधारकार्डची जोडणी केली आहे.

शंका करा दूर

तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.

  • स्टेप 1: सर्वात अगोदर, आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे. त्यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करावे लागेल
  • स्टेप 2: याशिवाय तुम्हाला 10 आकड्यांचा पॅन क्रमांक आणि 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर व्ह्यू लिंकवर जाऊन आधार स्टेटवर क्लिक करावे लागेल.
  • स्टेप 3: त्यानंतर तुमचा 10 अंकी पॅन कार्ड क्रमांक आणि 12 अंकी आधार क्रमांक टाका, त्यानंतर व्ह्यू लिंकवर आधार स्टेट्सवर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक अगोदरच लिंक असेल तर आधार क्रमांक दिसेल. तुमचा आधार क्रमांक अपडेट नसेल तर तुम्हाला लिकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • तुमचे पॅन-आधार स्टेटस तपासण्याची दुसरी पद्धत एसएमएस आहे. एसएमएसच्या मदतीने पॅन कार्ड-आधार कार्ड लिकिंगचे स्टेट्स चेक करता येते. त्यासाठी तुम्हाला 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
  • तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला मॅसेज पद्धतीने UIDPAN टाईप केल्यानंतर स्पेस सोडावी लागेल. त्यानंतर तुमच्या 12 अंकी आधार कार्ड टाईप करावा लागेल. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक टाईप करावा लागेल. त्यानंतर 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवा.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.