SBI Yono App : म्युच्युअल फंडात SIP द्वारे करा गुंतवणूक, या चार सोप्या पायऱ्यांनी भविष्य करा सुरक्षित
एसआयपी माध्यमातून तुम्ही जितकी रक्कम गुंतवणूक करु शकता तेवढा तुमचा फायदा अधिक होतो. वेळेनुसार ही रक्कम अनेक पटीत वाढते. चक्रवाढ व्याजाने मिळणारा परतावा तुम्हाला मालामाला करतो. दरवेळी केलेल्या एका छोट्याशा रक्कमेची गुंतवणूक भविष्यात तुम्हाला भलीमोठी कमाई करुन देते.
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो अॅपद्वारे (SBI Yono App) तुम्हाला म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करणे अगदी सोपे आहे. ही साधी युक्ती तुम्हाला भविष्यात श्रीमंत करेल. स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत एसबीआय म्युच्यूअल फंडा (SBI Mutual Fund) चालविण्यात येतो. एसबीआय म्युच्युअल फंड देशभरात लाखो गुंतवणुकदारांना डेट, हायब्रिड आणि इक्विटी फंडात (debt, Hybrid, Equity) गुंतवणुकीची संधी देऊन त्यांना चांगला परतावा देण्याचा प्रयत्न करते. या म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) ही होय. तुम्ही एसबीआय योनो अॅपच्या माध्यमातून एसपीआयच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येईल. एसआयपी माध्यमातून तुम्ही जितकी रक्कम गुंतवणूक करु शकता तेवढा तुमचा फायदा अधिक होतो. वेळेनुसार ही रक्कम अनेक पटीत वाढते. चक्रवाढ व्याजाने मिळणारा परतावा तुम्हाला मालामाला करतो. दरवेळी केलेल्या एका छोट्याशा रक्कमेची गुंतवणूक भविष्यात तुम्हाला भलीमोठी कमाई करुन देते.
हे पाच फंड गुंतवणुकीसाठी चांगले
पद्धतशीर गुंतवणूक योजनेसाठी स्टेट बँक इंडियाचे हे पाच म्युच्युअल फंड फायद्याचे आहे. एसबीआय स्मॉल कॅप फंड, एसबीआय ईटीएफ निफ्टी बँक फंड, एसबीआय मॅग्नम मल्टी कॅप फंड, एसबीआय डायनॅमिक बॉड फंड आणि मॅग्नम चिल्ड्रेन बेनिफिट प्लान यांचा या पाच फंडात सहभाग आहे. यातील एक ही असा फंड नाही ज्याने गेल्या 5 वर्षात 10 टक्क्यांहून कमी परतावा दिला असेल. पहिल्या क्रमांकावर एसबीआय स्मॉल कॅप फंड आहे, त्याने आतापर्यंत 22.27 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
एसआयपीचा फायदा
एसआयपीच्या मदतीने फंडात ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करु शकता. एसआयपीसाठी फार मोठ्या रक्कमेची गरज पडत नाही. अगदी 500 रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करु शकता. गुंतवणूक करण्यासाठी ठरलेल्या बँक खात्यातून दर महिन्याला एक निश्चित रक्कम निवडून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येते. त्यानंतर गुंतवणुकदाराला त्याच्या गुंतवलेल्या रक्कमेच्या बदल्यात नेट एसॅट व्हॅल्यू मिळते. त्याआधारे म्युच्युअल फंड युनिटची एक निश्चित संख्या त्याच्या खात्यावर जमा करण्यात येते.
छोट्या रक्कमेत परतावा
तुम्हाला वाटल्यास एसआयपीची रक्कम कमी अधिक करु शकता. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार एसआयपीची रक्कम कमी अधिक करता येते. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक करु शकता, वेळ आणि काळानुसार तुमचा पैसा वाढत जातो. या गुंतवणुकीत चक्रवाढ वृद्धी होत असल्याने त्यानुसार परतावा मिळतो आणि एक छोटी रक्कम मोठ्या रक्कमेत परतावा म्हणून मिळतो.
या आहेत गुंतवणुकीच्या चार पायऱ्या
जर तुम्हाला एसबीआयच्या म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करु शकतात. एसबीआय योनो अॅपद्वारे म्युच्यअल फंडात सहज गुंतवणूक शक्य आहे. गुंतवणुकीच्या या चार पाय-या आहेत. योनो अॅप वर लॉगिन करा, गुंतवणूक विभागात जा, एमएफ मध्ये गुंतवणूक करा या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या गुंतवणुकीची योजना निवडा.