UPI Payment | युपीआय पेमेंटला लागली नजर! व्यवहारावर शुल्क आकारण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव, किती मोजावे लागतील पैसे?

UPI Payment | झटपट रक्कम हस्तांतरीत करण्याची युपीआय सुविधा लवकरच सशुल्क होणार आहे. त्यामुळे युपीआय द्वारे पेमेंट केल्यास आता तुमच्याकडून शुल्क वसूल करण्यात येणार आहे.

UPI Payment | युपीआय पेमेंटला लागली नजर! व्यवहारावर शुल्क आकारण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव, किती मोजावे लागतील पैसे?
युपीआय पेमेंटने बसणार झाबूImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 4:43 PM

UPI Payment | युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface-UPI) भारतात सध्या सर्वाधिक लोकप्रिय व्यवहार हस्तांतरण पद्धत आहे. एका क्लिकवर समोरच्याला तात्काळ रक्कम मिळत असल्याने युपीआयचा वापर अशात जास्त वाढला आहे. सध्या या पद्धतीने व्यवहार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क (Charges) आकारण्यात येत नाही. परंतू ही लवकरच या सुविधेसाठी तुम्हाला शुल्क आकारण्यात येणार आहे. देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याविषयीचा प्रस्ताव तयार केला आहे. आरबीआयने डिस्कशन पेपर ऑन चार्जेस इन पेमेंट सिस्टम (Discussion Paper on Charges in Payment Systems) या नावाचा अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित केला आहे. त्यात आरबीआयने सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. डेबिट कार्ड व्यवहारासाठी एक निश्चित शुल्क आकारण्याचा योजना बँक करत आहे. सध्या डेबिट कार्ड व्यवहार हा पूर्णतः निःशुल्क आहे.

काय आहेत कारणे

खरं पाहता, इतक्या मोठ्या प्रमाणावर बेधडक युपीआय व्यवहार होत असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या माध्यमातून फायद्याचे गणित आजमावू पाहत आहे. त्यासाठी काहीतरी कारण पुढे करत आरबीआय ही सेवा सशुल्क करण्याच्या तयारीत आहे. युपीआयचा व्यवहार हा बँका सेवा देत असलेल्या IMPS सारख्या असल्याचा दावा केंद्रीय बँकेने केला आहे. त्यामुळे या सेवेवर तात्काळी शुल्क आकारणे योग्य आणि गरजेचे असल्याचे मध्यवर्ती बँकेचे म्हणणे आहे. आता अर्थात हे कारण तसे पचनी पडणे अवघड आहे, कारण आयएमपीएस द्वारे मोठी रक्कम हस्तांतरीत होते. तर युपीआयद्वारे सर्वसामान्य नागरीक हा दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमती अदा करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

किती द्यावे लागेल शुल्क?

या संशोधन पेपरनुसार, वेगवेगळ्या रक्कमेसाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. केंद्रीय बँकेने दावा केला आहे की, IMPS सारखेच युपीआयद्वारे रक्कमेचे हस्तांतरण होते. या सेवेद्वारे रिअल टाईम सेटलमेंट करण्यात येते. सुनिश्चित कालावधीत एक मर्चंट पेमेंट सिस्टम कार्य करत असल्याने ही सेवा सशुल्क करण्याचा विचार समोर आला आहे. तसेच यासंबंधीचे मूलभूत आराखडा ही तयार करण्यात येत असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

डेबिट कार्ड वापरणे ही तोट्याचे?

रिझर्व्ह बँकेने डेबिट कार्ड वापरण्यासाठी ही शुल्क आकारण्याचे ठरवले आहे. डेबिट कार्ड व्यवहारासाठी एक निश्चित शुल्क आकारण्याचा योजना बँक करत आहे. सध्या डेबिट कार्ड व्यवहार हा पूर्णतः निःशुल्क आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.