OLA Sack Employees | ओला देणार 1,000 कर्मचार्‍यांना नारळ, इलेक्ट्रिक कार निर्मितीत टाकणार पाऊल, काय आहे प्लॅन?

OLA Sack Employees | ओला 1,000 कर्मचार्‍यांना नारळ देण्याच्या तयारीत असून इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यवसायासाठी भरती वाढवण्याची योजना आखत आहे.

OLA Sack Employees | ओला देणार 1,000 कर्मचार्‍यांना नारळ, इलेक्ट्रिक कार निर्मितीत टाकणार पाऊल, काय आहे प्लॅन?
ओला कर्मचारी कमी करणारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 1:07 PM

OLA Sack Employees | ओला (OLA) त्याच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी (Electric Mobility) व्यवसायासाठी भरती प्रक्रिया वाढवण्याची योजना आखत आहे आणि दुसरीकडे, अर्बन मोबिलिटी फर्म (Urban Mobility Firm) सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. कंपनी एकाचवेळी ही परस्परविरोधी भूमिका पार पाडणार आहे. ET ने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, कंपनीत बदलाची प्रक्रिया सुरु असून काही आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे कंपनीवरील कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त भार कमी होऊन, त्याच बचतीत कंपनी दुसऱ्या प्रकल्पांवर खर्च करणार आहे. कंपनी तिच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची योजना आखत आहे. ओला लिथियम-आयन बॅटरी सेल्स आणि इलेक्ट्रिक कार (Electric Car) बनवण्याची योजना करत असल्याने भाड्याने घेण्याच्या तयारीत आहे. कामावरून काढण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे चार जणांना कामावर ठेवण्याची कंपनीची योजना आहे.

ही प्रक्रिया मोबिलिटी, हायपरलोकल, फिनटेक आणि त्याच्या वापरलेल्या कार व्यवसायावर लक्ष्य केंद्रित केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा या टाळेबंदीत समावेश आहे, त्यांना स्वेच्छेने राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी राजीनामा न दिल्यास अथवा या प्रक्रियेत वेळकाढूपणा करतील त्यांना कंपनी कामावरून हटवणार आहे. त्यामुळे कंपनीचा अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा भार हलका होईल आणि इतर उद्योग वाढीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ घेणे कंपनीला साध्य होईल. दुसरीकडे, कंपनी लिथियम-आयन बॅटरी सेल आणि इलेक्ट्रिक कार तयार करण्याची योजना आखत असल्याने आक्रमकपणे कामावर घेत आहे. कामावरून काढण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे चार जणांना कामावर ठेवण्याची कंपनीची योजना आहे.

हे सुद्धा वाचा

800 लोकांची भरती करणार

ईटीच्या अहवालात एका स्रोताचा हवाला देत म्हटले आहे की, कंपनी केवळ कारसाठी आणि सेल डेव्हलपमेंटसाठी सुमारे 800 लोकांची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. केवळ ओलाच नाही तर भारतातील इतर अनेक स्टार्टअप्स आर्थिक ताणामुळे खर्च कमी करण्यासाठी ले-ऑफचा अवलंब करत आहेत. अलीकडे, एडटेक युनिकॉर्न स्टार्ट-अप बायजूने (Byju’s) कायमस्वरूपी आणि कंत्राटी अशा 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.Byju’s व्यतिरिक्त, वेदांतू, Unacademy आणि Cars24 सारख्या नवीन पिढीतील उद्योगांनी देखील यावर्षी भारतात 5,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे.

ग्राहकांचा रोष

कंपनीने गेल्या वर्षी दणक्यात ईव्ही उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला होता. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरने प्री-लाँच बुकिंग सुरू केल्याच्या अवघ्या 24 तासांत 1 लाखांचं बुकिंग नोंदवलं होतं. हा कंपनीसाठी हा सुखद धक्का होता. पण नंतर डिलिव्हरीमध्ये होणारा विलंब आणि ब्रँडमधील तांत्रिक चुकांमुळे ओलाच्या वाहनांवर ग्राहकांनी संताप व्यक्त केला होता. काही ठिकाणी या कंपनीच्या स्कूटरला आग लागण्याच्या घटना ही घडल्या होत्या.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.