Income Tax : आयटी रिटर्न भरताना आता नो टेन्शन, लागलीच मिळेल अशी मदत

Income Tax : आयटी रिटर्न भरताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्यांच्यासाठी ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने करदात्यांसाठी त्वरीत मदतीचे आश्वासन दिले आहे. त्याचा असा फायदा होणार आहे..

Income Tax : आयटी रिटर्न भरताना आता नो टेन्शन, लागलीच मिळेल अशी मदत
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 6:00 PM

नवी दिल्ली : इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता आयटी रिटर्न भरण्याची तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी आयटी रिटर्न भरला आहे. तर अनेक जण आयटी रिटर्न भरण्याच्या तयारीत आहेत. पण काही ठिकाणी इंटरनेट, काही ठिकाणी योग्य फॉर्मची ओळख वा इतर अनेक समस्यांचा सामना करदात्यांना करावा लागत आहे. पण त्यांच्यासाठी ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने करदात्यांसाठी त्वरीत मदतीचे आश्वासन दिले आहे. या संस्थेने टॅक्स क्लिनिक (Tax Clinic) सुरु केले आहे. त्यामाध्यमातून अनेकांना आयटी रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणींमध्ये मदत मिळेल. कोणती आहे ही संस्था, कसा मिळेल फायदा..

काय आहे प्लॅन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटेंट्स ऑफ इंडियाने संपूर्ण देशात टॅक्स क्लिनिक सुरु करण्याची योजना आखली आहे. टॅक्स क्लिनिकच्या माध्यमातून इनकम टॅक्स फाईल करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या अडचणी समजून लागलीच त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न, मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या माध्यमातून करदात्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सीएकडून आयटी रिटर्न श्रीमंत, व्यापारी अथवा व्यावसायिक चार्टर्ड अकाऊंटंट कडून दरवर्षी त्यांचे इनकम टॅक्स रिटर्न फाईल करतात. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीशी सामना करावा लागत नाही. चार्टर्ड अकाऊंटंटमुळे त्याचे टेन्शन कमी होते.

हे सुद्धा वाचा

सर्वसामान्यांना अडचण सर्वसामान्य जनता, नोकरदार यांना प्राप्तिकर रिटर्न फाईल करताना अडचणी येतात. त्यांना नियमांची माहिती नसते. अनेकदा फॉर्म निवडीत चूक होते. अथवा एखादी त्रुटी राहते. त्यांना इतर पण समस्यांचा सामना करावा लागतो. पण आता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाने त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कर समितीकडून आयोजन आयसीएआय चे अध्यक्ष सीए अनिकेत सुनील तलाती यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. टॅक्स क्लिनिकच्या माध्यमातून अडचणी तर सोडविण्यात येतीलच, पण लोकांच्या मनातील अवाजावी भीती, कर भरतानाच्या त्रुटी कमी करण्यात येतील. त्यांच्यात जागरुकता आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. लोकांच्या समस्यांवर ठोस उपाय शोधण्यासाठी कर समितीकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जागरुकता कार्यक्रम आयसीएआईच्या 168 शाखांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये 5 क्षेत्रीय परिषदांच्या नेटवर्कचा समावेश आहे. 13 जुलै रोजी अनेक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे तर 14 जुलै रोजी पण देशातील अनेक ठिकाणी टॅक्स क्लिनिकच्या माध्यमातून जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

कशी करतील मदत इनकम टॅक्स रिटर्न फाईल करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी ही संस्था करदात्यांना मदत करेल. टॅक्स क्लिनिकच्या माध्यमातून करदात्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. ते नियमांच्या कचाट्यात अडकणार नाहीत. त्यासाठी त्यांना मदत करण्यात येईल. तसेच त्यांना आयटी रिटर्न भरण्यासंबंधी जागरुक करण्यात येईल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.