Visa Access | भारतीय पासपोर्ट असेल तर ‘या’ देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची गरज नाही

Visa Access News | जगभरातील सर्व देशांच्या पासपोर्ट्सचे रँकिंग जाहीर झाले असून जपानचा पासपोर्ट अव्वल ठरला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या यादीनुसार, जपानचा पासपोर्ट पॉवरफुल ठरला असून या यादीत भारताचा 87 वा क्रमांक आहे. भारतीय पासपोर्ट बाळगणाऱ्यांना 60 देशांमध्ये विना व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करता येईल.

Visa Access | भारतीय पासपोर्ट असेल तर 'या' देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची गरज नाही
इथं फिरा बिनधास्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 2:06 PM

Free Visa Access News | लंडनमधील ‘हेनली ॲंड पार्टनर्स’ या इमिग्रेशन कन्सल्टन्सीद्वारे दरवर्षी जगभरातील देशांचे पासपोर्ट रँकिंग जाहीर केले जाते. यंदा या यादीत जपानचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल ठरला असून तो प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जपानचा पासपोर्ट ( Japan passport) आहे, ते 193 देशांमध्ये व्हिसामुक्त अथवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करू शकतात. ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स’ नुसार, ( Henley Passport Index) या यादीत भारतीय पासपोर्ट 87 व्या क्रमांकावर असून भारतीय पासपोर्ट (Indian Passport) धारकांना 60 देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची गरज नाही. किंवा त्यांना व्हिसा ऑन अरायव्हल या सुविधेसह प्रवास करता येईल. जपानचा पासपोर्ट प्रथम क्रमांकावर, सिंगापूर आणि दक्षिण कोरिआचा पासपोर्ट दुसऱ्या क्रमांकावर तर जर्मनी व स्पेनचा पासपोर्ट तिसऱ्या स्थानावर आहे.

काय आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स ?

‘हेनली ॲंड पार्टनर्स ‘ ही लंडनमधील इमिग्रेशन कन्सल्टन्सी दरवर्षी जगभरातील देशांचे पासपोर्ट रँकिंग जाहीर करते. कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात स्ट्राँग आहे आणि कोणत्या देशाचा पासपोर्ट कमकुवत हे यादीवरून कळू शकते. ज्या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल किंवा प्रथम स्थानावर असतो ठरतो, तो पासपोर्ट बाळगणारे नागरिक जगातील जास्तीत जास्त देशांत जाण्यास आणि तिथे फिरण्यास पात्र ठरतात. 2022 सालच्या इंडेक्सनुसार, जपानचा पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जपानी पासपोर्ट आहे ते जगातील 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात तर भारताचा पासपोर्ट 87 व्या स्थानावर असून भारतीय पासपोर्ट धारक व्यक्ती 60 देशांमध्ये विना व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेचा वापर करून फिरू शकतात.

हे सुद्धा वाचा

‘हेनली ॲंड पार्टनर्स’ ही इमिग्रेशन कन्सल्टन्सी जगातील 199 देशांची नावे त्यांच्या यादीत समाविष्ट करते. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारे (IATA)देण्यात येणाऱ्या डेटाद्वारे विविध देशांच्या पासपोर्टचे रँकिंग निश्चित करण्यात येते. ज्या देशातील नागरिकांना व्हिसाची आवश्यकता नसते, त्या देशाच्या पासपोर्टला पहिला क्रमांक दिला जातो. यामध्ये व्हिसा ऑन अरायव्हल आणि परदेश यात्रेशी संबंधित अनेक घटकांचा समावेश असतो, ज्या आधारे त्या देशाचे पासपोर्ट रँकिंग ठरवले जाते.

भारतीय पासपोर्ट धारक कोणत्या देशांमध्ये व्हिसामुक्त फिरू शकतात ते जाणून घेऊ या

ओशनिया : कूक आयलंड, फिजी, मार्शल आयलंड, मायक्रोनेशिया, निय्वे ( Niue), पलाउ आयलंड, सामोआ, ट्युवालु ( Tuvalu), व्हॅनुअॅटू (Vanuatu).

मध्य-पूर्व : इराण, जॉर्डन, ओमान, कतार.

युरोप : अल्बानिया, सर्बिया.

कॅरेबियन : बार्बाडोस, द ब्रिटीश व्हरजिन आयलंड, डॉमिनिका, ग्रेनाडा, हैती, जमैका, मॉंटसेराट, सेंट किट्स ॲंड नेव्हिया, सेंट. ल्युशिया, त्रिनिदाद ॲंड टोबॅगो.

आशिया : भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मकाऊ, मालदिव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, तिमोर-लेसे.

अमेरिका : बॉलिव्हिया, एल सॅल्व्हाडॉर .

आफ्रिका : बॉट्स्वाना, बुरुंडी, केप व्हर्डे आयलंड, कॉमोरो आयलंड, इथिओपिया, गॅबॉन, गिनी बिसाउ (Guinea-Bissau), मादागास्कर, मॉरिटानिआ, मॉरिशिअस, मोझॅम्बिक, वँदा, सेनेगल, सियाचिल्स, सोमालिया, सिआरा लिऑन, टांझानिया, टोगो, ट्युनिशिया, युगांडा, झिम्बाब्वे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.