Post Office Scheme : पोस्टाची की खासगी बँकेची, कोणत्या एफडीत मिळेल परतावा जोरदार?

Post Office Scheme : रेपो दरात वाढ झाल्याने व्याजदरात ही वाढ झाली आहे. काही बँकांनी मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे पोस्टाची एफडी अधिक फायदेशीर असेल की छोट्या खासगी बँकांमधून होईल अधिक फायदा?

Post Office Scheme : पोस्टाची की खासगी बँकेची, कोणत्या एफडीत मिळेल परतावा जोरदार?
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:32 AM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo Rate) गेल्या काही महिन्यात सातत्याने वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनीही मुदत ठेवीवरील व्याज वाढवले आहे. यामध्ये छोट्या वित्तीय बँकांचाही समावेश आहे. या बँका मोठ्या बँकांच्या (Small Finance Bank ) तुलनेत अधिक दराने मुदत ठेव योजनेवर (Fixed Deposit) व्याज देतात. पोस्ट खात्याचीही मुदत ठेव योजना आहे. त्यावरही ग्राहकांना चांगले व्याज मिळते. स्मॉल फायनान्स बँकांवर अजूनही परंपरागत गुंतवणूकदारांचा विश्वास नाही. त्यामुळे अनेक जण पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करतात. परंतु, ज्यांना अधिक फायदा हवा आहे, त्यांना पोस्टाची मुदत ठेव योग्य असेल की छोट्या खासगी बँकांची एफडी फायदेशीर ठरेल?

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीम गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानण्यात येतो. केंद्र सरकार या गुंतवणुकीवर हमी घेते. सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7 टक्के व्याज मिळते. तर दुसरीकडे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत सर्वसामान्य नागरिकांना 1001 दिवसांच्या एफडीवर 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.5 टक्के व्याज मिळते. जन स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांना 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.8 टक्के व्याज देते.

यावर्षी आलेल्या एका अहवालात, मुदत ठेवीवरच भारतीयांनी विश्वास दाखवला आहे. शेअर बाजारात (Share Market) सातत्याने चढउतार होत असल्याने भारतीयांनी एफडीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. याविषयी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 44% टक्क्यांहून अधिक लोकांनी मुदत ठेवीत गुंतवणूक केल्याची माहिती दिली. तीन वर्षातच एफडीच्या माध्यमातून चांगली कमाई होत असल्याने भारतीयांनी मुदत ठेव योजनेत गुंतवणूक वाढवली. 23% लोकांनी आपत्कालीन निधीसाठी एफडीची तरतूद केली आहे. मुदत ठेव योजनेतील गुंतवणूक जोखीममुक्त असते. त्याचा परतावाही जोरदार आहे. तसेच विना जोखीम गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

हे सुद्धा वाचा

2017 मध्ये सेबीनेही एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार भारतातील 95% अधिक कुटुंबियांनी त्यांचा निधी शेअर बाजाराऐवजी मुदत ठेवीत ठेवणे पसंत केल्याचे सांगितले. तर केवळ 10% कुटुंबियांनी गुंतवणुकीसाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडला प्राथमिकता दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याविषयीचा आकडा दिला आहे. त्यानुसार, मार्च 2022 मध्ये बँकांच्या मुदत ठेव योजनेत 2,242.775 अब्ज अमेरिकन डॉलर पेक्षाही जास्त गुंतवणूक करण्यात आली होती.

स्मॉल फायनान्स बँकांच्या 5 लाख रुपयांच्या ठेवीवर विमा संरक्षण मिळते. जर तुम्हाला या छोट्या व्यावसायिक बँकांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट खात्याच्या मुदत ठेव योजनेपेक्षा स्मॉल फायनान्स बँकांच्या योजनेत अधिक फायदा होतो, हे निश्चित आहे. परंतु, अनेक गुंतणूकदार अधिक व्याजदराऐवजी गुंतवणुकीच्या सुरक्षिततेवर अधिक भर देतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा पोस्ट खात्याच्या एफडीकडेच आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.