Pan Card : दोन पॅन कार्ड हवेत कशाला तुम्हाला? सापडला तर बसेल असा दंडम की..

Pan Card : दोन पॅन कार्ड जवळ बाळगायला ते काही मेडल नाहीत. पण त्यासाठी तुम्हाला दंड लागेल त्याचं काय..

Pan Card : दोन पॅन कार्ड हवेत कशाला तुम्हाला? सापडला तर बसेल असा दंडम की..
पॅन कार्ड चा दंडम वाचवाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 4:12 PM

नवी दिल्ली : आधार कार्डप्रमाणेच (Aadhaar Card) पॅन कार्ड (Pan Card) ही महत्वाचा दस्तावेज आहे. बँकेत खाते उघडायचे असेल वा मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्हाला पॅन कार्ड द्यावे लागते. अशातच तु्मच्याकडे दोन पॅन कार्ड आढळल्यास तुम्हाला दंड (Fine)सहन करावा लागू शकतो.

प्राप्तिकर खात्याने (Income Tax Department) या चुकीच्या दुरुस्तीसाठी अगोदरच तरतूद केलेली आहे. या खात्यानुसार, एकाहून अधिक पॅनकार्ड असल्यास, ही बाब कायद्याच्या विरुद्ध आहे. आयकर अधिनियम 1961 मधील नियम 272B नुसार, तुम्हाला 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

त्यामुळे चुकून जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर एक झटपट परत करणे हे शहाणपणाचे लक्षण ठरते. पॅन कार्ड लागोलाग सरेंडर करणे, परत करणे हे हितवाह ठरते. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने याविषयीची प्रक्रिया पूर्ण करता येते.

हे सुद्धा वाचा

जेवढ्या लवकरच पॅन कार्ड परत करता येईल, तेवढा तुमचा फायदा अधिक होईल. प्राप्तिकर खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला पॅन कार्ड परत करण्याची प्रक्रिया राबविता येते आणि त्यानंतर पॅन कार्ड परत करता येते.

दोन पैकी एक पॅन कार्ड परत करणय्सााठी तुम्हाला अगोदर प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन Request for news pan card/ And changes Or Correction in pan card या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्याठिकाणी अर्ज डाऊनलोड करावे लागेल. अर्ज भरुन दोन्ही पॅनकार्ड, त्याची सत्यप्रत घेऊन NSDL च्या कार्यालयात जावे लागेल.

अतिरिक्त पॅन कार्ड जमा करताना, त्यासाठी 100 रुपयांच्या बाँडवर सत्यापन करुन द्यावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे पॅन कार्ड सरेंडर होईल. एखाद्याने ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीतर अशा पॅन कार्डधारकांना 10,000 रुपयांचा दंड सहन करावा लागू शकतो.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.