Bank FD Earning News | बाप्पा पावले, व्याजदर वाढले, FD मधून करा बंपर कमाई, या 5 सोप्या पॉइंट्समध्ये समजून घ्या फायद्याचे गणित

Bank FD Earning News | मध्यंतरी मुदत ठेव, बचत, आवर्ती ठेव योजनेवरील व्याजदरात मोठी कपात झाली होती. पण व्याजदरात वाढ झाल्याने मुदत ठेवीतील गुंतवणूक फायदेशीर ठरत आहेत. जर तुम्हाला FD गुंतवणूक करायची असेल तर या सोप्या टिप्स, तुम्हाला कामाच्या ठरतील..

Bank FD Earning News | बाप्पा पावले, व्याजदर वाढले, FD मधून करा बंपर कमाई, या 5 सोप्या पॉइंट्समध्ये समजून घ्या फायद्याचे गणित
एफडीचा फायदाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 1:54 PM

Bank FD Earning News | भारतीय रिझर्व्ह बँके (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) सलग वाढ केली. यंदा एकूण वाढ 1.40 बेसिस पाईंट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदर (Interest Rate) वाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महागाई (Inflation) कमी होईपर्यंत रेपो दर वाढीचे इंजेक्शन सुरु राहणार आहे. आता व्याजदर वाढीचा फायदा घ्यायचा असेल तर मुदत ठेवीत गुंतवणूक (Investment in FD) करणे हा सर्वोत चांगला पर्याय ठरू शकतो. त्यातच तुम्ही कर्ज घेतले असेल तर फायद्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेवीतील गुंतवणूक चांगली आहे. रेपो दरात वाढ झाल्याने एककीडे कर्जदर महाग होतील तर दुसरीकडे बचत योजनांमधून कमाई करता येईल. व्याजदर वाढले तर मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांची चांदी होईल. गुंतवणूक जेवढी जास्त असेल तेवढा अधिकचा फायदा होईल. मुदत ठेवीत कुठे आणि कशी गुंतवणूक करावी जेणेकरून अधिकचा परतावा मिळेल? फिनवाइजच्या संस्थापक प्रतिभा गिरीश याबाबत माहिती देत ​​आहेत. चला तर मग 5 मुख्य मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात..

मुदत ठेव किती दिवसांची हवी

मुदत ठेव योजनेत किती दिवस रक्कम गुंतवावी हे महत्वाचे आहे. 3 महिने, 6 महिने किंवा एक वर्ष अशी गुंतवणूक करता येते. जर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक कायम ठेवायची असेल अथवा आगामी खर्चाची तरतूद करायची असेल तर एफडीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्यातच जर अल्पकालावधीसाठी तुम्ही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करत असाल तर ते अधिक फायदेचं ठरेल. त्यामुळे एकतर लवकर पैसा हाती येईल आणि दरात घसरण झाली तर त्याचा फटका बसणार नाही.

आपत्कालीन निधीसाठी चांगला पर्याय

महागाई ज्या गतीने वाढते, त्या वेगाने बँकांचे व्याजदर वाढताना दिसत नाहीत. एफडीच्या बाबतीतही असेच आहे. डेट फंडही महागाई दरापेक्षा अधिकचा परतावा देत नाही. तरीही आपत्कालीन परिस्थितीत हा निधी उपयोगी पडतो. म्युच्युअल फंडात पैसे जमा केले आणि अचानक त्याची गरज पडली तर लागलीच रक्कम हाती येत नाही. शेअर बाजारात अस्थिरतेचा धोका असतो. पण FD मध्ये असा कोणताही धोका नसतो.

हे सुद्धा वाचा

एफडी कधीही मोडता येते

पैशांची अत्यंत निकड असेल तर एफडी मोडता येते. बँक खात्याशी ऑनलाईन ती जोडल्यास ती कधीही मोडता येते. थोडफार नुकसान होईल पण रक्कम हाती येते. डेट फंडाच्या बाबतीत असे होत नाही. जर बाजार बंद असेल आणि अचानक तुमच्यासमोर वैद्यकीय आणीबाणी आली, तुम्हाला गरजेसाठी ताबडतोब पैशाची गरज असेल, तर तुम्ही बाजार उघडल्यावरच फंडातून रक्कम काढू शकता. एफडीत मात्र तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पैसे मिळू शकतात.

कॉर्पोरेट एफडी उत्तम पर्याय

बाजारात अनेक प्रकारच्या मुदत ठेवी आहेत. बँक एफडी, पोस्ट ऑफिस एफडी आणि कॉर्पोरेट एफडी इ. आहेत. कोणत्या FD चे अधिक फायदे आहेत हे समजून घेतले पाहिजे. कॉर्पोरेट एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो. कारण जर कंपनी चांगली असेल तर ती सुरक्षिततेसह उत्तम परताव्याची हमी देते. हा परतावा बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या एफडीपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ, एचडीएफसी आणि बजाज फायनान्सच्या एफडीमधून चांगला नफा मिळवता येतो.

गरजेनुसार कर्ज घेता येईल

FD चे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे एफडीवर कर्ज घेता येते. कॉर्पोरेट एफडीमध्ये तर त्याचा अधिकचा फायदा मिळतो. कंपन्या तुम्हाला ताबडतोब एफडीवर कर्ज देतात. काही तासांत FD रकमेवर 90% पर्यंत कर्ज मिळते. FD वर कर्जासाठी लॉक इन परियडची आवश्यकता नसते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.