Tax on Savings : बचत खात्यावर किती द्यावा लागतो कर? जाणून घ्या नियम

Tax on Savings : बचतीची सवय चांगली आहे, पण त्यावर कर किती लागतो हे ही घ्या जाणून

Tax on Savings : बचत खात्यावर किती द्यावा लागतो कर? जाणून घ्या नियम
कराचे गणित काय
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 5:39 PM

नवी दिल्ली : बचत तर करतोय, पण त्यावर किती कर (Tax) द्यावा लागेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात कायम घोळत असतो.एकाच वेळी किती बचत खाते (Saving Account) सुरु ठेवता येतात? अधिक खाते असतील तर कर द्यावा लागतो का? आयकर खात्याची (Income Tax Department) वक्रदृष्टी पडते का? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात सतत येतात. बचत खात्यात कमाल किती रक्कम ठेवली तर आयकर खात्याची नोटीस (IT Notice) येत नाही, असा ही एक प्रश्न कायम असतो. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या बचतीवर किती कर लागू शकतो याची माहिती घेणे आवश्यक आहे.

तुमच्या बचत खात्यावर बँका वार्षिक व्याज (Annual Interest) देतात. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असते. त्यामुळे एका आर्थिक वर्षात साधारणतः बचत खात्यात किती रक्कम ठेवल्यास आयकर खात्याची नोटीस येणार नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

कराचा ससेमिरा मागे लागून घ्यायचा नसेल तर अर्थातच यासंबंधीच्या नियमांची उजळणी तुम्ही करणे आवश्यक आहे. मर्यादे पलिकडे व्यवहार झाल्यास अथवा मोठ्या रक्कमेची उलाढाल झाल्यास बँकेतील व्यवहारांच्या तपशीलावरुन आयटी खात्याची नजर तुमच्या खात्यावर पडेलच.

हे सुद्धा वाचा

सर्वसाधारण बचत खात्यात तुम्ही किती पण रक्कम जमा करु शकता आणि काढू शकता. या खात्यात रक्कम काढण्याची आणि जमा करण्याची तशी मर्यादा नाही. पण बँकेतील शाखेत जाऊन रोख रक्कम जमा करण्याची आणि काढण्याची प्रत्येक दिवशीची एक मर्यादा निश्चित असते.

परंतु, धनादेशाच्या माध्यमातून, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही दररोज एक रुपयांपासून ते हजार, लाख, कोटी अथवा अब्ज रुपयांपर्यंत बँकेच्या नियमानुसार उलाढाल करु शकतात. त्यासंबंधीची माहिती बँकेच्या संकेतस्थळावर आणि शाखेत देण्यात येते.

वार्षिक दहा लाखांची उलाढाल होत असले तर याविषयीची माहिती अर्थातच प्राप्तिकर खात्याला द्यावी लागते. बँकाही याविषयीची माहिती देतात. तुमच्या पॅनकार्ड आधारे व्यवहारांचा तपशील नोंदविल्या जात असतो. त्यामुळे ही माहिती आयकर विभागाला देण्यात येते.

करविषयक कायद्यानुसार, बँका चालू आर्थिक वर्षातील त्या खात्याची माहिती देतात, ज्यात मर्यादेपेक्षा जास्तीची उलाढाल झाली आहे. एका खात्यात, अथवा ग्राहकाच्या अनेक खात्यातून दहा लाख अथवा त्यापेक्षाच्या रक्कमेचा व्यवहार झाल्यास बँका यासंबंधीची माहिती देतात.

करंट अकाऊंटमध्ये रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा निश्चित आहे. ही मर्यादा 50 हजार अथवा त्यापेक्षा अधिक आहे. होस्टबुक लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष कपिल राणा यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, आयकर नियम 114E अंतर्गत एखाद्या व्यक्तीला खात्यातील उत्पन्न आणि खर्चाचा तपशील देणे बंधनकारक आहे.

त्यामुळे करंट अथवा सेव्हिंग अकाऊंटचा वापर करताना व्यवहार मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बचत खात्यात तेवढीच रक्कम जमा करा अथावा काढा की, तुम्ही आयकर खात्याच्या रडारवर येणार नाहीत.

बँकेतील बचत खात्यातील रक्कमेवर बँक व्याज जमा करते. बँक खातेदाराला कर द्यावा लागतो. बँक व्याजावर 10 टक्के टीडीएस कपात करते. बलवंत जैन यांच्या मते, व्याजावर कर द्यावा लागतो. पण कर सवलतीचा लाभ घेता येतो.

आयकर अधिनियमाच्या कलम 80 टीटीए नुसार, सर्व व्यक्तींना, खातेदारांना 10 हजार रुपयांपर्यंत कर सवलतीचा फायदा घेता येतो. व्याजाची रक्कम 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर या रक्कमेवर कर द्यावा लागत नाही.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.