Gold Silver Rate : सोने-चांदी खरेदी महागणार..सरकारच्या या निर्णयाचा बसणार फटका..

Gold Silver Rate : सोने-चांदी खरेदी आता महागणार आहे. त्यामुळे सणासुदीत तुमच्या आनंदावर विरजण पडू शकते..काय आहे कारण..

Gold Silver Rate : सोने-चांदी खरेदी महागणार..सरकारच्या या निर्णयाचा बसणार फटका..
सोने-चांदी खरेदी महागलीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 4:38 PM

नवी दिल्ली : सणासुदीत सोने-चांदी (Gold-Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण केंद्र सरकारच्या (Central Government) या एका निर्णयाचा फटका तुम्हाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे सोने-चांदीचे दागिने महाग (expensive) होणार आहे.

सरकारने सोने-चांदीच्या हॉल मार्किंगच्या शुल्कात वाढ केली आहे. भारतीय मानक ब्यूरोने (BIS) एक अधिसूचना दिली. त्यानुसार, सोन्याच्या दागिन्यासाठी हॉलमार्किंग शुल्क 35 रुपये ते 45 रुपये झाले आहेत. त्यामुळे दागिने तयार करण्यासाठी आता जादा रक्कम मोजावी लागेल.

तर चांदीचे आभुषण आणि दागिन्यांवर हॉलमार्किंगसाठी 25 ते 35 रुपये प्रति दागिने चार्ज द्यावा लागेल. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर आता जादा शुल्क मोजावे लागणार आहे. ऐन सणासुदीत ही दरवाढ झाल्याने महिलावर्ग नाराज होणार आहे.

हे सुद्धा वाचा

नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने हॉलमार्किंगची घोषणा केली होती. त्यानुसार देशभरातील सोने व्यापाऱ्यांनी आभुषणे आणि दागिन्यांवर हॉलमार्किंग करावे असा निर्णय जाहीर केला होता. 15 जानेवारी 2021 रोजीपासून हा निर्णय अनिवार्य करण्यात आला होता.

सोने आणि चांदीवरील हॉलमार्किंग शुल्काची (Gold Hallmarking Charges) गणना मान्यता प्राप्त तुकड्यांच्या वजनानुसार केली जाते. शुल्काची गणना दागिने आणि आभुषणाच्या वजनानुसार करण्यात येत नाही. भारतीय मानक ब्यूरोने 2018 नंतर पहिल्यांदा हॉलमार्किंग शुल्कात वाढ केली आहे. हॉलमार्किंगचा नियम 2018 मध्येच जाहीर झाला होता.

सर्व हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये बीआयएस लोगो, शुद्धतेचा ग्रेड आणि सहा अंकांचा अल्फान्यूमेरिक कोड असतो. त्याला HUID असे ही म्हणतात. ज्वेलर्स सोने वितळवून त्यापासून भारतीय मानक आईएस 1417:2016 नुसार, ग्रेड 14, 18 वा 22 कॅरेटचे दागिने तयार करु शकतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.