Gold Investment | सोन्यातील गुंतवणुकीचे सुवर्णमय पर्याय, सॉलिडपासून डिजिटलपर्यंत सोन्यात करा गुंतवणूक

Gold Investment | सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार सॉलिड गोल्ड, ईटीएफ, गोल्ड बॉण्ड्स किंवा डिजिटल गोल्ड अशा प्रकारात नशीब आजमावू शकतात.

Gold Investment | सोन्यातील गुंतवणुकीचे सुवर्णमय पर्याय, सॉलिडपासून डिजिटलपर्यंत सोन्यात करा गुंतवणूक
सोन्याचा भाव घसरलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 3:00 PM

Gold Investment | सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते. आता तर भारतातच बुलियन एक्स्चेंजची(Bullion Exchange) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने आयात करणे सोप्पं झालं आहे. त्याचबरोबर देशभरात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आता सोन्याचा एकच भाव (One Nation One Rate) राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. सोन्यात गुंतवणुकीचे (Gold Investment) अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. भारतीयांचे सुवर्णवेड जगप्रसिद्ध आहे. चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयातदार आहे. किमतींतील अस्थिरता पाहता बाजारातील तज्ज्ञ आता सोन्यात हळूहळू आणि विविध पर्यायांसह गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. भारतात सोन्यात गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत ज्यांचा वापर केला जाऊ शकतो. साधारणपणे गुंतवणुकीचे तीन भाग केले जाऊ शकतात ज्यात सॉलिड सोने (Solid Gold) , पेपर सोने (Paper Gold) आणि डिजिटल सोने (Digital Gold) यांचा समावेश आहे. या पर्यायांचे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घ्या.

सॉलिड सोने

सॉलिड सोने हा सोन्यात गुंतवणुकीचा सर्वात सामान्य मार्ग आहे, त्यात दागिने, सोन्याची नाणी, बिस्किट आणि विट यांचा समावेश होतो. ग्राहक हे सॉलिड गोल्ड घरात दागिन्यांच्या अथवा इतर रुपात ठेवतात. तसेच ते भेट म्हणून ही दिल्या जाते. सणाच्या दिवशी सोने खरेदी करणे भारतीयांमध्ये शुभ मानल्या जाते. विशेष म्हणजे हे सोने ठेऊन तुम्ही रोख रक्कम घेऊ शकता. परंतू, परताव्याच्या दृष्टीने ते इतके आकर्षक नाहीत कारण ज्वेलर्स त्यांच्यावर शुल्क आकारतात. हे सोने चोरीच्या किंवा हरवण्याची भीती जास्त असते. त्याचबरोबर सोन्याच्या शुद्धतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. असे असले तरी त्यावर कर्ज घेता येते. हे सोने भविष्यातील गुंतवणूक म्हणून साठवल्या जाते. विशेष प्रसंगी दागिने म्हणून वापरू शकता किंवा भविष्यात भेट म्हणून देऊ शकता. सराफा बाजारात सॉलिड सोने खरेदी करता येते. ज्वेलर्सच्या सोने बचत योजनेत सामील होऊ शकता आणि योजनेच्या शेवटी थोडी रक्कम भरून दागिने खरेदी करू शकता.

हे सुद्धा वाचा

पेपर गोल्ड

पेपर गोल्ड ही आधुनिक गुंतवणुकीची पद्धत आहे. यामध्ये प्रत्यक्ष सोने मिळत नाही. मात्र सोन्याच्या चालू मूल्यावर तुम्हाला गुंतवणूक करता येते. शुद्ध सोन्यात गुंतवणुकीशी संबंधित सर्व फायदे मिळतात. यामध्ये गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आणि सार्वभौम सुवर्ण रोखे यांचा समावेश आहे. गुंतवणुकीसाठी ठोस सोन्यापेक्षा हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला घरात दागिन्यांची गरज नसेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी सोने घ्यायचे असेल किंवा सोन्यातील तेजीचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. या पद्धतीत सोने हरवले किंवा चोरीला जाण्याचे कोणतेही टेंशन नसते. ETF सह, तुम्ही सोन्याच्या किंमतीतील बदलांचा फायदा लवकर घेऊ शकता. त्याच वेळी, सार्वभौम गोल्ड बाँडच्या मदतीने, दीर्घ कालावधीत सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होण्याबरोबरच तुम्ही निश्चित व्याजाचा लाभ घेऊ शकता. एकच तोटा आहे, तो म्हणजे तुम्हाला हे सोने अंगावर घालता येत नाही.

डिजिटल सोने

डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्स डिजिटल सोन्याचा पर्याय देत आहेत. ज्यांना सोन्यात 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड हा योग्य पर्याय आहे. यामध्ये ग्राहकांना आवडीनुसार खरेदी-विक्री करण्याची सोय आहे. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला सोने खरेदी-विक्रीची सुविधा मिळते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.