Consumer : टेन्शन लेना का नही, देने का! ऑनलाईन ऑर्डरमधील फसवणूक कंपन्यांना महागात पडणार

Consumer : ऑनलाईन शॉपिंग करताना अनेकदा आपल्याला फटका बसतो. दोषयुक्त उत्पादन आपल्या माथी येते. अनेकदा ही फसवणूक आपण कोणाला सांगत ही नाही. पण आता ग्राहकांना मोठी मदत मिळणार आहे.

Consumer : टेन्शन लेना का नही, देने का! ऑनलाईन ऑर्डरमधील फसवणूक कंपन्यांना महागात पडणार
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 9:26 PM

नवी दिल्ली : आता ऑनलाईन खरेदीचा (Online Shopping) ट्रेंड आहे. अनेक जण ऑफलाईन ही खरेदी करतात. पण अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. काही उत्पादनात दोष असतो. त्यांचा दर्जा चांगला नसतो. अनेकदा एक्सपायरी डेट संपलेली उत्पादने माथी मारण्यात येतात. कंपनी अथवा डिलिव्हरी करणारा प्लॅटफॉर्म ही उत्पादने परत घेण्यास नकार देतात. अशावेळी ग्राहकाच्या अडचणी वाढतात. त्यांचा पैसाही वाया जातो आणि माल, वस्तूही खराब (Default Products) मिळते.  ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 अंतर्गत ग्राहकांना मोठे अधिकार देण्यात आले आहे. ते खराब उत्पादनाविषयीच तक्रार करु शकता. त्याआधारे ग्राहकांना या फसवणुकीविरोधात तक्रार दाखल करता येणार आहे. कंपन्यांना  धडा शिकवता येणार आहे.

सरकारने घेतला पुढाकार

केंद्र सरकारने ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. ग्राहकांना आता अधिकार मिळाले आहेत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. जर तुम्हाला ही असे वाटत असेल की, वस्तू, सामान खरेदी करताना तुमची फसवणूक होत आहे, तर त्याविषयीची तुम्हाला तक्रार करता येईल. तसेच तुम्ही कंपनीकडून या बोगस उत्पादनाची नुकसान भरपाई पण मागू शकता.

हे सुद्धा वाचा

हेल्पलाईन क्रमांकावर करा कॉल

ग्राहक विभाग, ग्राहक मंत्रालय, सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ग्राहकांसाठी हेल्पलाईन क्रमांक 1915 दिला आहे. या राष्ट्रीय तक्रार निवारण क्रमांकावर ग्राहकाला सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तक्रार नोंदविता येतात. National Consumer Helpline म्हणजे NCH मोबाईल ॲप पण उपलब्ध आहे. या ठिकाणी तक्रार नोंदविता येते. उमंग मोबाइल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तक्रार नोंदविता येईल. तुम्ही 8800001915 या क्रमांकावर SMS करु शकता. ‘जागो ग्राहक जागो’ या ट्विटर खात्यावर तुम्ही तक्रार करु शकता.

ऑनलाइन तक्रार करा

केंद्र सरकारने ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. ग्राहकांना आता अधिकार मिळाले आहेत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. तुम्ही 8800001915 या क्रमांकावर तक्रार करण्यासाठी  SMS करु शकता. जर तुम्हाला ऑनलाईन तक्रार दाखल करायची असेल तर NCH च्या पोर्टलवर https://consumerhelpline.gov.in/ लॉग इन करता येईल. याठिकाणी तुम्ही खाते तयार करा. त्यानंतर तुम्हाला तक्रार दाखल करता येईल. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 अंतर्गत ग्राहकांना मोठे अधिकार देण्यात आले आहे. ते खराब उत्पादनाविषयीच तक्रार करु शकता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.