Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल कार विसरुन जा, जुन्या चारचाकी भंगारात..या ठिकाणी कायमची बंदी..

Petrol-Diesel : या ठिकाणी येत्या 10-12 वर्षांत पेट्रोल-डिझेल कार कायमच्या हद्दपार होणार आहे..

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल कार विसरुन जा, जुन्या चारचाकी भंगारात..या ठिकाणी कायमची बंदी..
पेट्रोल-डिझेल कार हद्दपारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 2:47 PM

नवी दिल्ली: जगभरातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा (Automobile Industry) कल इलेक्ट्रिक व्हेईकलकडे (Electric vehicle) पूर्णपणे झुकला आहे. पर्यावरणाची चिंता आणि पारंपारिक इंधनाचे मर्यादीत संसाधने यामुळे मानवाला नवीन पर्याय अंगिकारणे आवश्यक झाले आहे. त्यातच आता इलेक्ट्रिक व्हेईकलची लोकप्रियता हळूहळू वाढत असल्याने काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल कार (Petrol-Diesel Car) पूर्णपणे हद्दपार करण्याचा ठराव घेण्यात येत आहे.

युरोपीय संघाने पेट्रोल-डिझेल कारला शेवटचा रामाराम करण्याची पूर्ण तयारी केली आहे. युरोपीय संघातील देशांनी 2035 पर्यंत सर्व पेट्रोल-डिझेल वाहनांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला आहे.

युरोपीय संघाच्या सदस्य देशांनी 2035 पर्यंत नव्या पेट्रोल-डिझेल कार उत्पादन आणि विक्रीला प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत या देशात इलेक्ट्रिक व्हेईकल आणि इतर पर्यायी वाहनांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

युरोपीय संघाच्या सर्व सदस्य देशांनी या ठरावावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे येत्या 10-12 वर्षांत या देशातून पेट्रोल-डिझेल कार हद्दपार होतील. त्यामुळे येथील प्रदूषणाचा प्रश्न कमी होणार आहे.

‘फिट फॉर 55’ या योजनेतंर्गत युरोपीय आयोग, युरोपीय संसद आणि युरोपीय संघ यांनी पर्यावरण संरक्षणासाठी हे पाऊल उचलले आहेत. सदस्य देशांनी या करारातील पहिल्या टप्प्यात हे पाऊल टाकले आहे.

जागतिक तापवान वृद्धीसाठी इंधनावरील सर्वच वाहनं आणि उपकरणांवर हळूहळू बंदी आणण्याची तयारी सदस्य देशांनी सुरु केली आहे. त्यासाठी योजना आखण्यात आली आहे.

एवढेच नाही तर जल, वायू प्रदूषण थांबविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर युरोपीय संघाचे सदस्य देश गंभीर प्रयत्न करत आहे. त्यासाठीच्या उपयायोजना राबविण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.