Term Plan : टर्म इन्शुरन्स घेतला म्हणजे कुटुंब सुरक्षित झालं का रे भाऊ?

Term Plan : एक टर्म प्लॅन सर्व जबाबदारीतून खरंच मुक्त करतो का? कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये करण्यात येणारे दावे किती खरे असतात, सर्वसामान्यांना खरंच त्याचा तितका फायदा मिळतो का

Term Plan : टर्म इन्शुरन्स घेतला म्हणजे कुटुंब सुरक्षित झालं का रे भाऊ?
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 5:10 PM

नवी दिल्ली : विमा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. विम्यातही अनेक प्रकार आहेत. देशात भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) विम्यात आघाडी घेतली. लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यात गुंतवणूक, बचत योजना जोडली. पण त्यामुळे मोठा परतावा मिळाला नाही. विम्याचे म्हणाले तर त्याचा उपयोग झाला. सध्या तरुणांमध्ये टर्म विम्याचे प्रचलन आहे. कुटुंबाची चिंता असेल तर टर्म प्लॅन घेण्याचा सल्ला देण्यात येतो. टर्म इन्शुरन्समुळे (Term Insurance) तुमच्या कुटुंबाला चांगली सुरक्षा मिळते असा दावा करण्यात येतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मोठी रक्कम मिळते, असे सांगण्यात येते. एक टर्म प्लॅन (Term Plan) सर्व जबाबदारीतून खरंच मुक्त करतो का? कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये करण्यात येणारे दावे किती खरे असतात, सर्वसामान्यांना खरंच त्याचा तितका फायदा मिळतो का

एका टर्म प्लॅनमुळे सुरक्षित होईल कुटुंब? एका टर्म प्लॅनमुळे खरंच कुटुंब सुरक्षित होऊ शकतं का, अनेकदा विमा पॉलिसी ऐवजी टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदीचा सल्ला देण्यात येतो. कुटुंबाला भली मोठी रक्कम मिळण्याचा दावा करण्यात येतो. एका टर्म इन्शुरन्स सर्व गरजा पुर्ण करतो की, त्यासोबत अजून एखादी विमा पॉलिसी खरेदी करणे फायद्याचे ठरते.

टर्म विमा कशासाठी गरजेचा टर्म विम्याचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे तो स्वस्त असतो. त्याचा हप्ता, प्रीमियम मोठा नसतो. कमी पैशात, जास्त विमा संरक्षण मिळते. इतर विमा योजनांच्या तुलनेत टर्म इन्शुरन्स कमी प्रीमियममध्ये मिळतो. विमा पॉलिसीत तेवढ्या कव्हरेजचा प्लॅन अत्यंत महागडा मिळतो. त्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते.

हे सुद्धा वाचा

हप्ता बंद पडल्यास अडचण टर्म प्लॅन हा एकदाच रक्कम भरुन घेता येतो. तो एक वर्ष अथवा काही कालावधीसाठी असतो. विमा पॉलिसी ही 10 अथवा 20 वर्षांसाठी असते. त्याचा मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक हप्ता भरावा लागतो. अकाली मृत्यू झाल्यास विमा रक्कम मिळते. पण गुंतवणुकीचा परतावा मिळण्यासाठी काही योजनांमध्ये हप्ता बंद न करता सुरु ठेवावा लागतो. आता काही विमा पॉलिसीमध्ये हप्ता भरण्याची गरज उरलेली नाही. पण टर्म प्लॅनमध्ये एकदाच रक्कम भरावी लागते.

टर्म प्लॅनची मर्यादा काय टर्म प्लॅन किफायतशीर हप्त्यात, प्रीमियममध्ये मिळतो. त्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत नाही. पण टर्म प्लॅनचा एक कालावधी आहे. त्या ठराविक कालावधीत काहीच अघटित घडलं नाही तर या प्लॅनचा काहीच उपयोग होत नाही. तुम्ही टर्म प्लॅन नुतनीकरण करत असाल तर तुम्हाला सवलत मिळत नाही. नुकसान भरपाईचा दावा केला नाही म्हणून मागील प्रीमियम रक्कम पण परत मिळत नाही.

आरोग्य विमा केवळ टर्म इन्शुरन्सवर भागत नाही. त्यासाठी आरोग्य विमा (Health Insurance) घेणे आवश्यक आहे. गंभीर आजार, अपघातात रुग्णालयात भरती होण्याचे काम पडल्यास लाखो रुपये खर्च होतात. अत्यावश्यक सेवेच्या वेळी तुमच्याकडील सर्वच जमा रक्कम खर्च होऊ शकते. त्यामुळे टर्म प्लॅनसोबतच तुम्हाला भविष्यातील आर्थिक गुंतवणुकीचे गणित बिघडू नये यासाठी आरोग्य विमा खरेदी करणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.