Confirm Ticket : एका मिनिटात कन्फर्म तिकीट, ही ट्रिक पडेल उपयोगी, आरामात करा रेल्वेचा प्रवास..

Confirm Ticket : या सणासुदीत कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडू शकते..

Confirm Ticket : एका मिनिटात कन्फर्म तिकीट, ही ट्रिक पडेल उपयोगी, आरामात करा रेल्वेचा प्रवास..
कन्फर्म तिकीटासाठी ही ट्रिकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 6:42 PM

नवी दिल्ली : दूरच्या प्रवासावेळी (Long Journey) सीट मिळणे आवश्यक असते. अशावेळी कन्फर्म तिकीट (Confirm Ticket) असेल तर ताण मिटतो. रेल्वेत (Indian Railway) तात्काळ सेवेतंर्गत कन्फर्म तिकीट मिळून जाते. पण सणासुदीत मोठी अडचण असते. अशावेळी ही ट्रिक वापरल्यास तिकीटासाठी नाहक ताप सहन करावा लागत नाही.

ऑनलाईन तात्काळ तिकीट बूक करताना प्रवाशाच्या तपशील भरण्यातच जास्त वेळ जातो. तोपर्यंत तात्काळचा कोटा पूर्ण होऊन जातो. एखाद्याने तपशील त्वरीत भरला तरी, पेमेंटच्या प्रक्रियेत तिकीट काही मिळत नाही.

कन्फर्म तिकीट हवे असेल तर अनेकदा ऑफलाईन पद्धतीने तिकीट काऊंटरवर कित्येक तास वाट पाहत रहावी लागते. याठिकाणी ताटकाळत बसण्याऐवजी कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी काही ट्रिक वापरणे आवश्यक ठरते.

हे सुद्धा वाचा

तात्काळमध्ये कन्फर्म तिकीटासाठी IRCTC वर तुम्हाला तिकीट बूक करता येते. त्यासाठी इंटरनेटचे कनेक्शन चांगले हवे. त्यानंतर तात्काळ पेमेंट होईल अशी पद्धत निवडावी लागेल. त्यात युपीआय आणि संबंधित अॅपचा वापर करता येईल.

पण हे सर्व आयुध वापरुनही अनेकदा कुठे न कुठे धोका मिळतोच. एकतर इंटरनेटचा स्पीड कमी पडतो. कधी पेमेंट हँग होते. अशावेळी कोणती अशी ट्रिक उपयोगी पडेल, ज्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल हे पाहुयात..

IRCTC च्या मास्टर लिस्ट (Master List) या पर्यायाने तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता बळावते. ऑनलाईन तिकीट बूक करण्यासाठी या पर्यायाचा तुम्हाला वापर करता येईल.

मास्टर लिस्ट हे एक फिचर आहे. हे फिचर IRCTC च्या अॅप व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मास्टर लिस्ट मध्ये तुम्हाला प्रवासाचा तपशील तयार ठेवावा लागतो. यामध्ये प्रवाशाचा योग्य तपशील अपडेट करावा लागतो.

तिकीट बुकिंग करताना तपशील अगोदरच समाविष्ट असल्याने तुम्हाला त्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही. बुकिंग सुरु होताच तुम्हाला मास्टर लिस्टचा पर्याय निवडून तिकीट बूक करता येईल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.