Bank Statement : बँक स्टेटमेंट येतात तर तपासा तरी, कशाला स्वतःचे नुकसान करता, फायदा घ्या जाणून

Bank Statement : बँक स्टेटमेंट चेक करण्याचे अनेक फायदे आहेत. दर महिन्याला बँक स्टेटमेंट जनरेट होते आणि तुम्हाला ई-मेलवर पाठविण्यात येते. पण अनेकदा आपण हा ई-मेल चेक न करताच डिलिट करतो. ही एक प्रकारे आपली आर्थिक कुंडली असते.

Bank Statement : बँक स्टेटमेंट येतात तर तपासा तरी, कशाला स्वतःचे नुकसान करता, फायदा घ्या जाणून
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:10 PM

नवी दिल्ली : ऑनलाईन बँकिंगमुळे (Online Banking) आपल्याला आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे. पण आर्थिक व्यवहाराचा तपशील ठेवणे ही सोपे झाले आहे. त्यासाठी तुम्हाला डोक्याला ताप लावून घेण्याची आवश्यकता नाही. आपण महिन्याभरात जो काही बँक व्यवहार करतो, एटीएममधून रक्कम काढतो. रक्कम हस्तांतरीत करतो. आपल्या रोजच्या व्यवहाराचा सर्व तपशील बँकेच्या स्टेटमेंटमधून (Bank Statement Check) बाहेर पडतो. बँक खात्यातून होणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवहारासाठी बँक स्टेटमेंट महत्वाचा दस्तावेज आहे. पण आपण बऱ्याचदा ई-मेलवर येणाऱ्या बँक स्टेटमेंटकडे दुर्लक्ष करतो. बँक स्टेटमेंट तपासण्याचे अनेक फायदे आहेत. दर महिन्याला बँक स्टेटमेंट जनरेट होते आणि तुम्हाला ई-मेलवर पाठविण्यात येते. पण अनेकदा आपण हा ई-मेल चेक न करताच डिलिट करतो. ही एक प्रकारे आपली आर्थिक कुंडली असते.

बँकेचे स्टेटमेंट चेक केल्याने तुम्हाला बँकेने कोणते कर लावले, सरचार्ज लावला याची माहिती मिळते. तसेच बँकेने कोणत्या दिवशी, किती आणि कोणत्या कारणासाठी शुल्क कपात केली याची सर्व माहिती ग्राहकांना या बँक स्टेटमेंटच्या माध्यमातून मिळते. आपल्या खात्यातील सर्व प्रकारचा व्यवहार, त्याचा तपशील बँक स्टेटमेंटमधून मिळतो.

अनेकदा आपण खर्च करताना लक्ष देत नाही. दणादण डेबिट कार्ड फिरवतो. एटीएममधून धडाधड रक्कम काढतो. शॉपिग, फिरण्यात, मौजमजा करताना तर आपल्याला खर्चाचे भानच उरत नाही. आपण खर्चाकडे दुर्लक्ष करतो. पण महिन्याच्या शेवटी आपल्याला बँक खाते आरसा दाखवते. बँक खात्यात शिल्लक नसते आणि मग आपल्याला रक्कम नेमकी किती आणि कुठे खर्च केली हेही नीट आठवत नाही.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी खर्चाचे बजेट बिघडते. त्यावेळी बँक स्टेटमेंट फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्याला खर्च बेताचाच ठेवण्याचे ज्ञान मिळते. हा एक प्रकारचा महिन्याचा अलार्मच आहे. त्यावर नजर टाकली की आपण कुठं कुठे नाहक आणि फालतू खर्च केला याचा तपशील आपल्या हाती येतो. पुढील वेळी खर्च करताना बँक स्टेटमेंट आपल्याला हात आखडता घेण्यासाठी मदत करते. त्यामुळे बचतीला प्रोत्साहन मिळते.

तुमच्या खात्यात येणारी मिळकत आणि तुम्ही वारेमाप करत असलेला खर्च, यातून महिन्या काठी काही शिल्लक तुमच्या गाठीशी उरते. त्यातून अचानक खर्च आल्यास तुमची धांदल उडते. बँक स्टेटमेंटमुळे महिन्याकाठी किती शिल्लक उरली आणि किती तुम्ही वाचवू शकला असता हे समजते. जर तुमच्याकडे सरप्लस पैसा असेल तर तुम्ही ही रक्कम आवर्ती ठेव योजनेत गुंतवू शकता अथवा इतर ठिकाणी गुंतवू शकता. तसेच इतर असे व्यवहार जे तुम्ही केले नाहीत. पण तुमच्या खात्यातून ती रक्कम वळती झाली असेल तर तुम्हाला त्याची माहिती बँक स्टेटमेंटच्या सहायाने कळते आणि तुम्ही त्याविषयीचा योग्य निर्णय घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.