UPI Payments | युपीआय पेमेंट करताना रहा सावध, नाहीतर झटक्यात बँक खाते होईल रिकामे

UPI Payments | युपीआय पेमेंट करताना पुरेशी काळजी घेतली नाही की, तुमचे खाते साफ झालेच म्हणून समजा. सध्या ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहे. त्यामुळे युपीआय पेमेंट करताना सतर्क रहा.

UPI Payments | युपीआय पेमेंट करताना रहा सावध, नाहीतर झटक्यात बँक खाते होईल रिकामे
व्यवहार करताना घ्या काळजीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 12:08 PM

UPI Payments News | युपीआय (UPI) पेमेंटसने देशात डिजिटल क्रांती आणली आहे. राष्ट्रीय देयके महामंडळाच्या (NPCI) ताज्या आकडेवारीनुसार, UPI आधारित डिजिटल पेमेंटचे व्यवहार या ऑगस्ट महिन्यात 10.73 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. जुलै महिन्यातील 10.63 लाख कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या तुलनेत हा आकडा वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात UPI व्यवहारांद्वारे एकूण 657 कोटी व्यवहार करण्यात आले. मागील महिन्यात हा आकडा 628 कोटी होता. युपीआयच्या माध्यमातून डिजिटल व्यवहाराला (Digital transactions) सध्या चांगली चालना मिळाली आहे. युपीआयच्या मदतीने सहज रक्कम हस्तांतरीत करता येते. पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या अॅपच्या माध्यमातून झटकन व्यवहार पूर्ण होतात. युपीआय पेमेंट करताना काळजी घेतली नाही तर तुमचे खाते साफ (Fraud)झालेच म्हणून समजा. सध्या ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहे. त्यामुळे युपीआय पेमेंट करताना सतर्क रहा.

IMPS द्वारे 46.69 कोटींचे व्यवहार

ऑगस्टमध्ये, तात्काळ पैसे हस्तांतरीत पद्धत आधारित IMPS द्वारे 4.46 लाख कोटींचे व्यवहार पूर्ण झाले. गेल्या महिन्यात इमिजिएट पेमेंट सेवेद्वारे (IMPS) एकूण 46.69 कोटी व्यवहार झाले. जुलैमध्ये IMPS च्या माध्यमातून 4.45 लाख कोटी रुपयांचे एकूण 46.08 कोटी व्यवहार झाले. परंतु, आधारवर आधारित ‘AEPS’ (AePS) चे व्यवहार जुलै महिन्यात 30,199 कोटी रुपयांवरून 10 टक्क्यांनी घसरून 27,186 कोटी रुपयांवर आले आहेत .

युपीआ पेमेंट करताना ही काळजी घ्या

1. व्यवहार करण्यापूर्वी UPI आयडी व्हेरिफाय करा

हे सुद्धा वाचा

पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी UPI आयडी वापरला जातो. अशा वेळी, जेव्हाही तुम्हाला कोणाकडून पैसे मिळतात, तेव्हा तुमचा UPI आयडी एकदा क्रॉस चेक करणे महत्त्वाचे आहे.

2. एका अॅपमध्ये एकापेक्षा जास्त UPI वापरू नका

कोणत्याही अॅपमध्ये एकापेक्षा जास्त UIP खाते वापरू नका. युजर्स एका अॅपच्या मदतीने इतर अॅप्सवर देखील पैसे देऊ शकतात.

3. फोनवर स्क्रीन लॉक ठेवा

जर तुम्ही UPI अॅप वापरत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की बहुतेक लोक ते अनेक वेळा पिन टाकताना तुमचा मोबाईल पाहतात मग यावर उपाय म्हणून तुमच्या फोनवर स्क्रीन लॉक ठेवणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही.

4. UPI पिन शेअर करू नका

UPI पेमेंट करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा चार किंवा सहा अंकी UPI पिन. कोणाशीही शेअर करू नका, हे महत्त्वाचे आहे. हा पिन वापरुन फसवणुककर्ता सेकंदात तुमचे खाते रिकामे करु शकतो.

5. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अनेक एसएमएसमध्ये कॅशबॅक आणि डिस्काउंटद्वारे UPI आयडी हॅक केला जाऊ शकतो, ज्यामुळे युजर्स समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.