1000 Note : 2,000 हजार रुपयांच्या नोटेला टाटा, 1000 हजार रुपयांच्या नोटेचं कमबॅक?

1000 Note : 2,000 रुपयांच्या नोटा मे महिन्यात माघारी बोलविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरु असेल. या नोटेला पर्याय म्हणून 1000 हजाराच्या नोटेचं कमबॅक होणार आहे का?

1000 Note : 2,000 हजार रुपयांच्या नोटेला टाटा, 1000 हजार रुपयांच्या नोटेचं कमबॅक?
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 5:30 PM

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : 2000 रुपयांची नोट (2000 Note) बंद करण्याचे वादंग संसदेपर्यंत गाजले. मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोट माघारी बोलविण्याचा निर्णय घेतला. 23 मे पासून ही या नोटांची घरवापसी सुरु झाली. सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या संसदेचे सत्र सुरु आहे. त्यात ही मुद्दा गाजला. केंद्र सरकार पर्यायी नोट म्हणून 1000 रुपयांची (1000 Note) नोट बाजारात परत आणणार का? 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कालावधी वाढून देण्यात येणार आहे का? 500 रुपयांच्या नोटेविषयी (500 Note) काय धोरण आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्याला केंद्र सरकारने थेट ही उत्तरे दिली. काय म्हटलं केंद्र सरकार..

कालावधी वाढणार?

विरोधी पक्षातील काही नेत्यांनी 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी कालावधी वाढवणार का? असा सवाल केला. त्यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले. 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया 23 मे रोजी सुरु झाली. 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यत ही प्रक्रिया सुरु राहील. त्यानंतर कालावधी वाढविण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले. तोपर्यंतच नागरिकांना गुलाबी नोटा जमा करता येतील. हा मोठा कालावधी असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

पुन्हा होणार नोटबंदी?

काळे धन संपविण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा नोटबंदीची तयारी करत आहे का? या प्रश्नावर अनेकांनी जोर दिला. या प्रश्नाला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले. केंद्र सरकारचा सध्या नोटबंदी अथवा चलन बंदी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सात वर्षांपूर्वी कारवाई

केंद्र सरकारने 2016 मध्ये नोव्हेंबर महिन्यात, 8 तारखेला नोटबंदीचा बडगा उगारला होता. त्यावेळी 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. चलन व्यवस्था सुरळीत होण्यासाठी 2000 रुपयांची गुलाबी नोट छापली होती. सात वर्षानंतर केंद्र सरकारने या वर्षी मे महिन्यात 2000 रुपयांची नोट परत बोलावली. केंद्र सरकारने नोटबंदीला घरवापसीचे नाव दिले. 23 मे पासून ते 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यत ही प्रक्रिया सुरु आहे.

1000 रुपयांची नोट पुन्हा सुरु होणार?

काही सदस्यांनी 1000 रुपयांची नोट पुन्हा सुरु करणार का? असा सवाल विचारला. त्यावर अर्थ राज्यमंत्री थेट उत्तर दिले नाही. नोटांच्या व्यवस्थापनासाठी 2000 रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेने माघारी बोलावल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नाला बगल दिली. त्यावर थेट प्रतिक्रिया दिली नाही. 1000 रुपयांची नोट सध्यातरी बाजारात येण्याची अपेक्षा त्यामुळे नाही.

इतर नोटा जास्त

दोन हजारांची नोट बाजारातून माघारी बोलविण्यात येत आहे. तर 1000 रुपयांची नोट बाजारात आणण्याची पुन्हा घाई नाही. त्यामागे इतर नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

500 रुपयांची नोट अधिक मूल्यांची

देशात अजून 1000 रुपयांच्या नोटेचा काहीच फैसला झालेला नाही. 2000 रुपयांच्या नोटेची घरवापसी झाली आहे. त्यामुळे बाजारात 500 रुपयांची नोट अधिक मूल्यांची नोट ठरली आहे.

या नोटा चलनातून बाद

आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी 1946 मध्ये पहिल्यांदा 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा जानेवरी 1978 मध्ये पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.