Over Weight Woman : 450 किलो वजन, पण महिलेने 362 किलो कमी केलं, घराचं दार तोडून बाहेर काढलं होतं,आता खिडकीतूनही..

Overweight Woman : एकेकाळी अगडबंब असलेल्या या महिलेने केलेला कायापालट सर्वांनाच धक्का देणारा ठरला. या महिलेचे वजन 450 किलो होते, त्यानंतर तिने जो बदल केला, तो पाहुन अनेकांनी तोंडात बोटं घातली, काय आहे तिच्या या ट्रान्सफॉर्मचं गुपीत

Over Weight Woman : 450 किलो वजन, पण महिलेने 362 किलो कमी केलं, घराचं दार तोडून बाहेर काढलं होतं,आता खिडकीतूनही..
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 10:00 PM

नवी दिल्ली : निसर्गच सर्व चमत्कार दाखवतो, असे नाही. कधी कधी इच्छाशक्तीही मोठा चमत्कार दाखविते. तर या महिलेबाबत असेच काही घडले. ही महिला म्हणजे खरीखुरी अगडबंबच. तिच्या वजनाची जगभर चर्चा झाली. जगातील सर्वात वजनदार महिला (Over Weight Woman) म्हणून तिची ओळख होती. पण या महिलेने खचून न जाता सर्वांच्या नाकावर टिच्चून जो काही बदल केलाय ना राव, तो तुम्हाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. पण वेटलॉसचा (Weigh Loss) तमाशा न करता,तीने कोणत्या क्लासमधून, योगा गुरुकडून, पुस्तकातून हा फंडा शिकला, याचीच एक वेगळी चर्चा व्हायला लागली. या महिलेच्या दृढनिश्चियाने तिने तिचा ‘काया’पालट केला.

मायरा रोसल्स (Mayra Rosales) ही अगडबंब म्हणून ओळखल्या जाणारी महिला अमेरिकेतील. तीन नुकतीच TLC Show Half-Ton Killer या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने तिची आपबित्ती मांडली. तिचं वजन इतकं वाढलं की, तिच्या हालचाली मंदावल्या. तिला बेडवरच पडून रहावं लागलं. तिच्या शरिरातील खालच्या भागात वेगाने चरबी वाढली. तिला पायावरही उभं राहता येईना.

चरबीने तिच्या शरीराचा ताबा घेतला. आपण आता लवकरच मरणार या कल्पनेने मायराचा थरकाप उडायचा. त्यानंतर तिने या चरबीतून स्वतःची सूटका करण्याचा दृढनिश्चिय केला. मनाचा हिय्या केल्यावर तिने वजन कमी करण्यासाठी नेटाने प्रयत्न केला. तिच्या प्रयत्नांना यश आले. तिचे वजन जवळपास 362 किलो कमी केले. तिचा हा ट्रान्सफॉर्म लूकने अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला. ही छब्बीदार छब्बी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला.

हे सुद्धा वाचा

मायराने तिच्यावरील संकटांची आलेली मालिका या शोमध्ये मांडली. 2008 साली तिच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. तिच्यावर 2 वर्षाच्या भाच्याची हत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या कथित आरोपाखाली तिला घरातून कोर्टात नेण्यासाठी तिचं घर तोडण्यात आलं. तिला नेण्यासाठी व्हॅन आणण्यात आली. कोर्टात मायरासाठी किंग साईज मॅट्रेसची तजवीज करण्यात आली होती.

मायराने गुन्हा कबूल केला. पण तिने सांगितला की हा एक अपघात होता. पण या खूनप्रकरणा पुन्हा एकदा मोठी कलाटणी मिळाली. तिची बहिण जैमीने, आपणच मुलाला मारले, त्यात तो मरण पावल्याची कबुली दिली. हा एक अपघात असल्याचे उघड झाले. यानंतर मायरावरील सर्व आरोप हटविण्यात आली. तर मुलाच्या मृत्यूप्रकरणात जैमीला 15 वर्षांची शिक्षा झाली.

भाच्याच्या खूनप्रकरणातून मायराची सूटका झाली असली तरी बहिणी 15 वर्षांसाठी कारागृहात जावे लागल्याने मायराला धक्का बसला. पण ती यासर्व घटनांतून बाहेर आली. या चरबीतून सूटका करुन घेण्यासाठी मायरावर 6 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर तिने व्यायाम आणि डायटाच मार्ग धरला. आता तिला डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर यातून मुक्ती मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.