या प्रसिद्ध कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून तीनदा येणार ‘रविवार’; मिळणार 3 Week Off

आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतर एकदाचा रविवार कधी उजाडतोय याची वाट अनेक कर्मचारी पाहत असतात. त्यातही आठवड्यातून एकच दिवस सुट्टी (Week Off) असेल तर तो रविवारचा दिवस सुरू कधी होतो आणि संपतो कधी याचाही पत्ता लागत नाही.

या प्रसिद्ध कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून तीनदा येणार 'रविवार'; मिळणार 3 Week Off
Office workImage Credit source: file photo
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 10:20 AM

आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतर एकदाचा रविवार कधी उजाडतोय याची वाट अनेक कर्मचारी पाहत असतात. त्यातही आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असेल तर तो रविवारचा दिवस सुरू कधी होतो आणि संपतो कधी याचाही पत्ता लागत नाही. मग पुन्हा सुरू होते सोमवारी कामाला जायची तयारी. कोरोनानंतर आता बहुतांश कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम (Work From Home) हळूहळू बंद करण्यात येत आहे. अशा वेळी कामासाठी करणारा लागणारा प्रवास आणि त्यानंतर आठ किंवा नऊ तासांचं काम आणि एवढं सगळं करून आठवड्यातून मिळणारी एक दिवस सुट्टी.. यामुळे अनेक कंपन्यांमध्ये किमान आठवड्यांतून दोन दिवस सुट्ट्यांची मागणी होताना दिसते. मात्र एका प्रसिद्ध कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना चक्क आठवड्यातून तीन वीक ऑफ (3 Week Off) दिले आहेत. या कंपनीने जाहीर केलं की आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील फक्त चार दिवस कामाला यावं लागणार आहे. सध्या जगभरात कंपनीच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. कर्मचाऱ्यांना 3 वीक ऑफ देणारी ही कंपनी आहे पॅनासोनिक (Panasonic).

पॅनासोनिक ही जपानी कंपनी आहे. जपानच्या सरकारच्या दिशानिर्देशानंतर या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की अधिकच्या सुट्ट्यांदरम्यान कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलाबाळांसोबत, आईवडिलांसोबत, एखादं समाजकार्य करण्यासाठी किंवा कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी हा वेळ घालवता येईल. ‘जपान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पॅनासोनिक कंपनीने आठवड्यातून तीन वीक ऑफ देण्याचा हा पर्याय सध्या प्रायोगिक तत्ताववर सुरू केला आहे. याचे परिणाम कसे असतील ते पाहिल्यानंतर त्याला नियमितपणे लागू करण्यात येईल.

जपानमध्ये याआधीपासून Hitachi, Mizuho, Fast Retailing, Uniqlo, Financial Group यांसारख्या कंपन्या आधीपासूनच त्यांच्या कर्मचाऱ्यांना तीन वीक ऑफ देत आहेत. “अशा कंपन्या छोट्या वर्कवीक स्कीमच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतेय”, असं रेक्रुट वर्क्स इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संशोधक हिरोमी मुराता म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.