TRENDING NEWS : मृत भावाच्या नावावर घेत होता फायदा, 58 वर्ष फसवलं
एखाद्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. एका व्यक्तीने मेलेल्या भावाचा नावाचे पुरावे तयार करुन 58 वर्ष फसवलं असल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
नवी दिल्ली : काही व्यक्ती अशा (VIRAL NEWS) असतात की, त्या आपल्या फायद्यासाठी काहीही (TRENDING NEWS) करायला तयार होतात. बरं त्याची कल्पना करणं सुध्दा अनेकांना अवघड असतं. असाचं एक प्रकार सध्या उजेडात आला आहे. एका व्यक्तीने आपल्या फायद्यासाठी एक मोठा अपराध केला आहे. हा ज्यावेळी प्रकार पोलिसांना समजला, त्यावेळी पोलिस (AMERICAN POLICE) सुध्दा हैराण झाले. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने हा गुन्हा करीत आपलं आयुष्य काढलं आहे.
आरोपीचं वय 86 वर्षे आहे
हा प्रकार अमेरिका देशात घडला आहे. हा प्रकार नेपोलियन गोंजालेजशी संबंधित आहे, सध्या आरोपीचं वय 86 वर्षे आहे. त्या माणसाने १९६० सालापासून फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात असे घडले की त्याने आपल्या मृत भावाची ओळख चोरली. त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक पद्धतीच्या सोशल सिक्योरिटीचा फायदा मिळाला. ज्यावेळी त्या व्यक्तीने आपल्या भावाच्या ओळख सांगून त्याच्या नावाची बनावट पासपोर्ट आणि राज्य ओळखपत्र तयार केलं. त्याचा फायदा ती व्यक्ती मागच्या कित्येक वर्षापासून घेत राहिली.
या कारणामुळे प्रकरण आलं उजेडात
या गोष्टीचा खुलासा पहिल्यांदा 2010 साली झाला. त्यावेळी त्या व्यक्तीला सरकारने पैसे देणं बंद केलं. त्यानंतर २०२० मध्ये ओळखपत्र सॉफ्टवेअरद्वारे, दोन राज्य ओळखपत्रांमध्ये नेपोलियन गोन्झालेझच्या चेहरा सारखा असल्याचं आढळून आलं. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहेत. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता.
तर ती २० वर्षाची शिक्षा झाली असती
ज्यावेळी आरोपीला पोलिसांनी कोर्टात सादर केले, त्यावेळी त्या व्यक्तीने कोर्टात न्यायाधिशांच्या समोर सगळ्या गोष्टी कबूल केल्या आहेत. आरोपीच्या भावाचा मृत्यू १०३९ साली झाला होता. परंतु आरोपीने त्यांच्या भावालाा कागदावरती मरु दिले नाही. त्यावेळी राज्याचे फायदे जाणून घेतल्यावर आरोपीच्या मनात लोभ तयार झाला.त्यानंतर आरोपीने संपूर्ण आयुष्य भावाच्या ओळख पत्रावरती काढलं. हे सगळं ऐकल्यानंतर न्यायालयाने त्या आरोपीला कसल्याही प्रकारची शिक्षा सुनावली नाही. त्या व्यक्तीला शिक्षा दिली असती तर, तर ती २० वर्षाची शिक्षा झाली असती.