विमान टेकऑफ करणार होतं इतक्यात अपघाचे फोटो प्रवाश्यांच्या फोनवर, मग एकच गोंधळ!

इस्राईलच्या तेल अवीव शहरात अशीच एक विचित्र घटना घडली आहे.तेल अवीवमध्ये एक विमान टेक ऑफ करतानाच त्याला ते थांबवावं लागलं. अन् पुन्हा टर्मिनलवर परतावं लागलं. विमान अपघाताचे भयावह फोटो या विनामातील प्रवाशांना पाठवण्यात आले. होते

विमान टेकऑफ करणार होतं इतक्यात अपघाचे फोटो प्रवाश्यांच्या फोनवर, मग एकच गोंधळ!
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 1:30 PM

मुंबई : कधी कधी काही विचित्र घटना समोर येतात. त्यामुळे मन हेलावतं. सुन्न व्हायला होतं. समाजातील काही मानसिकतांची कीव येते.  इस्राईलच्या (Israel) तेल अवीव शहरात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. तेल अवीवमध्ये (Tel Aviv) एक विमान टेक ऑफ करतानाच त्याला ते थांबवावं लागलं. अन् पुन्हा टर्मिनलवर परतावं लागलं. विमान अपघाताचे भयावह फोटो या विनामातील प्रवाशांना पाठवण्यात आले. त्यामुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी विमान थांबवण्याची मागणी केली. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral News) होतेय.

नेमकं काय घडलं?

इस्राईलच्या तेल अवीव शहरात अशीच एक विचित्र घटना घडली आहे.तेल अवीवमध्ये एक विमान टेक ऑफ करतानाच त्याला ते थांबवावं लागलं. अन् पुन्हा टर्मिनलवर परतावं लागलं. विमान अपघाताचे भयावह फोटो या विनामातील प्रवाशांना पाठवण्यात आले. त्यामुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी विमान थांबवण्याची मागणी केली. अज्ञाताने हे फोटो पाठवल्याची माहिती आहे.त्यामुळे प्रवाश्यांमध्ये भीती पसरली अन् विमानाला टर्मिनलवर परतावं लागलं. त्यानंतर विमानातील लोकांच्या सामानाचीही झडती घेण्यात आली. हे विमान तेल अवीवहून इस्तंबूलला जात होतं. त्या दरम्यान ही घटना घडली. या विमानात 160 प्रवासी प्रवास करत होते.

फोटो नेमके काय आणि कुठले?

विमानात बसलेल्या काही प्रवाशांना आक्षेपार्ह फोटो पाठवण्यात आले होते. हे विमान अपघाताचे फोटो होते. ज्यामुळे प्रवश्यांमध्ये घबराट पसरली. पण हे सगळे फोटो 2009 मध्ये अॅमस्टरडॅममध्ये झालेल्या तुर्की एअरलाइन्सच्या विमान अपघाताचे होते. अॅमस्टरडॅममध्ये झालेल्या या विमान अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता.

तर काही प्रवाशांना 2013 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या एशियाना एअरलाइन्सच्या अपघाताचे फोटो पाठवण्यात आले होते. विमानात बसलेल्या डायना या प्रवाशाने माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या म्हणाल्या, “या घटनेनंतर एक महिला बेशुद्ध पडली आणि एकाला पॅनिक अटॅकही आला”

या घटनेनंतर इस्राईल पोलिसांनी 9 इस्रायली नागरिकांना अटक केली आहे. या घटनेत हे सर्व दोषीवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. त्यांना 3 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.