तिसरीतील मुलीने मोदींना पाठवला व्हिडिओ, अधिकाऱ्यांची हवा झाली टाइट, मग काय झाले पाहाच

Seerat Naaz : जम्मू-काश्मीरमधील सीरत नाज ही आठ वर्षांच्या मुलीने केलेला व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. तिने सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल केला. मग त्यानंतर अधिकारी सरळ शाळेत आले. तिला आएएस अधिकारी व्हायचंय आहे.

तिसरीतील मुलीने मोदींना पाठवला व्हिडिओ, अधिकाऱ्यांची हवा झाली टाइट, मग काय झाले पाहाच
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 4:36 PM

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सीरत नाज ही तिसरीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी चर्चेत आली आहे. सीरतने तिच्या शाळेच्या दुर्दशेबाबत सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल केला. तिच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियातमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली. पाहता, पाहता हा व्हिडिओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला. मग अधिकारी सरळ शाळेत आले.  सीरतने तिच्या शाळेची परिस्थिती या व्हिडिओमध्ये सांगतील. त्यानंतर अधिकाऱ्यांची हवा टाईट झालीय. माध्यमांचे लक्ष सीरत हिच्या व्हिडिओकडे गेले. तिची मुलाखत प्रसारीत झाली.

काय केले सीरतने

सीरत हिने तिच्या तीन खोल्यांच्या सरकारी शाळेची दुरवस्था एक व्हिडिओमधून मांडली. यामध्ये ती म्हणते सुरवातील म्हणते, मोदी जी आप सबकी बात सुनते हो, मेरी भी बात सुन लो. देखो हमारा फर्श कितना गंदा हो गया है. हमें यहां नीचे बिठाते हैं. डेस्क भी नहीं है. शेवटी ती म्हणचे “कृपया मोदीजी, आमच्यासाठी एक चांगली शाळा बनवा, ना?”

काय आहे व्हिडिओमध्ये

व्हिडिओमध्ये शाळेची एक दुमजली इमारत दिसत आहे. तिची दुरवस्था झाली आहे. ती पाहता शाळा अर्धवट अवस्थेत बांधून सोडून दिल्याचे दिसते. मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काही दिवसांनी जम्मूचे शालेय शिक्षण संचालक रविशंकर शर्मा यांनी शाळेत आले आणि काम सुरु झाले.

शाळेचे काम सुरु झाल्यानंतर दुसरा व्हिडिओमध्ये सीरत म्हणते, मोदी सरांनी यांना पाठवले. शाळेचे काम सुरु झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे.

शाळेत 250 मुले

या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सुमारे 250 मुले शिकतात. तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या परिसराच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सांगण्यावरून 2013 ते 14 च्या दरम्यान इमारत बांधण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर 20 लाख रुपयेही दिले. 2017 मध्ये इमारतीसाठी पुन्हा 30 लाख रुपये देण्यात आले. 2017 मध्येच काम थांबले. आता पुन्हा काम सुरु झाले आहे. सीरतने IAS अधिकारी होण्याची महत्वकांक्षा व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.