Expensive Countries : भारत नाही, तर जगातील हे आहेत सर्वात महागडे देश!

Expensive Countries : वाढत्या महागाईने सर्वच देशांना हैराण केले आहे. पण सौंदर्याची खाण असलेल्या या देशांमध्ये राहणे हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर आहे. जगातील सर्वात महागडा देश कोणता आहे, माहिती आहे का?

Expensive Countries : भारत नाही, तर जगातील हे आहेत सर्वात महागडे देश!
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 10:05 AM

नवी दिल्ली : जगातील सर्वच देशात महागाईचा (Inflation) आगडोंब उसळला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील सर्वच वस्तू, राहणे यांचा खर्च वाढला आहे. जगाच्या पाठीवर काही देशांना अभिजात सौंदर्य लाभलेले आहे. या देशांमध्ये निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. पण या देशात राहणे सर्वसामान्य माणसाचे काम नाही. कारण या देशात राहण्याचा खर्च सर्वाधिक आहे. जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशातील नागरिकांना वाटते की, त्यांचा देश महाग आहे, असे वाटते. तर अमेरिका, रशिया, ब्रिटेन, जर्मनी यासारख्या देशात राहण्याचा खर्च सर्वाधिक असेल, असे अनेकांना वाटते, पण जगातील सर्वात महागडा देश (Expensive Country) कोणता आहे, माहिती आहे का?

या देशांचा नाही समावेश फायनेन्शिअल इंडेक्सने, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सनुसार, जगातील 10 सर्वात महागड्या देशांची एक यादी तयार केली आहे. या यादीतील देशांची नावे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे देश जगातील सर्वात महागडे देश आहेत. या यादीत अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी आणि फ्रास यासारख्या देशांतील शहरांचा समावेश नाही.

हा आहे महागडा देश महागड्या देशांच्या यादीत सर्वात पहिला देश बर्म्युडा आहे. या देशाचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. प्रत्येकाला या सुंदर देशात राहण्याची इच्छा आहे. अमेरिकेच्या तुलनेत बर्म्युडाची कॉस्ट ऑफ लिव्हिंग, राहण्याचा खर्च सर्वाधिक आहे. जगाचा स्वर्ग म्हणून ओळख असलेला स्वित्झर्लंड हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे सुद्धा वाचा

हा आईसलँड महाग तर महागड्या देशात तिसऱ्या स्थानावर केयमन आईसलँड (Cayman Islands) आहे. या देशात प्रत्येक महिन्याला, खाणे-पिणे, कपडे, औषधोपचार, मनोरंजन, दळणवळण आणि इतर खर्च मिळून महिन्याला एक लाख रुपयांहून अधिकचा खर्च येतो. चौथ्या आणि त्यानंतरच्या क्रमांकावर इस्त्राईल हा देश आहे. या देशात महागाईने कळस गाठला आहे. येथे राहणे सर्वाधिक खर्चिक आहे.

प्रवास खर्च अधिक नॉर्वे (Norway) जगातील महागड्या देशांपैकी एक आहे. जगातील सर्वात महागड्या देशांच्या यादीत हा सहाव्या स्थानी आहे. या देशात खाणे-पिणे आणि प्रवासाचा खर्च सर्वाधिक आहे. या देशात युरोपपेक्षा अधिक महागाई आहे. युरोपातील इतर देशांपेक्षा हा खर्च 25 टक्के अधिक आहे.

इथं मोजावी लागते अधिक रक्कम जगातील महागड्या देशांच्या यादीत टर्कस आणि केकॉस आईलँडचा समावेश आहे. हे दोन्ही आईसलँड सातव्या क्रमांकावर आहेत. तर 8 व्या क्रमांकावर ब्रिटेनचे एक सुंदर आर्यलंड आहे. येथे राहणे सर्वात महाग आहे. येथील छोट्या रेस्टॉरंटमधील जेवण साधारणपणे 6800 रुपयांना मिळते. येथे राहणे महाग असले तरी जगण्याचा आणि निसर्गाचा भरपूर आनंद घेता येतो.

सर्वात शेवटी कोण या यादीत 9व्या आणि 10व्या क्रमांकावर डेनमार्क आणि बारबाडोस हे दोन देश आहेत. येथे राहणेच नाही तर दैंनदिन जीवनातील वस्तू पण महाग आहे. या देशात दळणवळणासाठी अधिक खर्च करावा लागतो. जगातील महागड्या देशांची यादी दरवर्षी बदलते. त्यात उलटफेर होतो. पण बर्म्युडा, स्वित्झर्लंड आणि डेनमार्कसारखे देश या यादीतून बाहेर पडत नाहीत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.