VIRAL NEWS | चार पायांच्या मुलीचा जन्म, डॉक्टरांनी सांगितलं कारण
सध्या एका बातमीची सगळीकडं चर्चा सुरु आहे. एका जन्माला आलेल्या बाळाला चार पाय असल्यामुळे डॉक्टरांना सुध्दा धक्का बसला आहे. त्या मुलीला पाहायला रुग्णालयात गर्दी सुध्दा झाली होती.
मुंबई : आतापर्यंत आपण अनेक नमुने पाहिले आहे. एखाद्या मुलाचा जन्म (baby birth) ज्यावेळी होतो. त्यावेळी त्याचं शरीर व्यवस्थित असल्याचं पाहून त्यांच्या आईवडिलांना किंवा कुटुंबियांना प्रचंड आनंद होतो. परंतु एखाद्या मुलाला एखादी गोष्ट नसेल तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. अनेक अपंग मुलांचे त्रास आपल्याला कुठे दिसल्यानंतर पाहत नाही. मध्यप्रदेश राज्यातील (Madhya pradesh) एक नवं प्रकरण उजेडात आलं आहे. विदिशामध्ये एका महिलेने चार पायांच्या मुलांना जन्म दिला आहे. ज्यावेळी त्या मुलाची डिलीव्हरी झाली. त्यावेळी त्या मुलाला पाहून डॉक्टरांना (doctor) सुध्दा धक्का बसला आहे. हे प्रकरण मंडी बामौरा सामुदायिक स्वास्थ्य केंद्र येथील आहे.
एका महिलेने चार पायांच्या मुलीला जन्म दिला आहे. त्यांना अजून तीन मुली आहेत. त्या महिलेचं वय ३० वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की, लाखात एखादं असं प्रकरण पाहायला मिळतं. जन्माला आलेल्या मुलीची अवस्था गंभीर असल्यामुळं विदिशा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं होतं. तिथून सुध्दा त्या मुलीला डॉक्टरांनी एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे.
डॉक्टरांनी सांगितली स्टोरी
चार पायांच्या मुलीची सगळीकडं मोठी चर्चा आहे. सोशल मीडियावर त्या मुलीचा फोटो सुध्दा व्हायरल झाला आहे. सगळीकडे त्या मुलीचे पाय पाहून प्रत्येकजण आपला अंदाज व्यक्त करीत आहेत. डॉक्टरांच्या भाषेत त्याला इशियोपेगस म्हणतात. लाखात एखाद्या मुलाचा अशा पद्धतीने जन्म होतो. त्याचं शरीर गरजेपेक्षा अधिक असतं.
बाळाचं होणार ऑपरेशन
चार पाय असलेल्या मुलीचं प्रकृती ठीक नाही, गंभीर आहे, त्या मुलीला भोपाळच्या एम्स रुग्णायात दाखल करण्यात आलं आहे. तिथं त्या मलींच्या पायावरती सर्जरी करण्यात येणार आहे. दोन पाय शरीरापासून वेगळे करण्यात येणार आहेत. सध्या त्या मुलीचा जीव वाचवण्यात डॉक्टर व्यस्त आहेत. विदिशा जिल्ह्यात या आगोदर सुध्दा असा प्रकार उजेडात आला आहे. एका महिलेने हात आणि पाय नसलेल्या मुलीला जन्म दिला होता.