Viral Video: जिंदगी और कुछ भी नहीं…हे प्रेम कळालं, तर तुम्ही आयुष्य जिंकलं, भावूक नाही झाले तर नवलंच!

या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वृद्ध दाम्पतय दिसतं. अंगावर सुरुकुत्या पडलेल्या, थरथरणारे हात, डोळ्यांची अंधूक होत चाललेली नजर मात्र तरीही एकमेकांच्या ओढीने आसुसणारा जीव.

Viral Video: जिंदगी और कुछ भी नहीं...हे प्रेम कळालं, तर तुम्ही आयुष्य जिंकलं, भावूक नाही झाले तर नवलंच!
हे प्रेम पाहणं तुमचं नशीब असेल...
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 6:10 PM

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होतो आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या (Trending Video) उड्या पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आहे प्रेमाचा…प्रेमाच्या ओलाव्याचा..आणि एकमेकांच्या काळजीचा. प्रेम कधी मरत नाही असं म्हणतात,आणि हेच वाक्य या व्हिडीओतून अधोरेखित होताना दिसतं. या व्हिडीओत एक वृद्ध दाम्पत्य (Elderly Couple) जे काही करत आहे, त्यातून प्रेम या शब्दाला आणखी वजन येतं. एका महिला IAS अधिकाऱ्यांने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वृद्ध दाम्पतय दिसतं. अंगावर सुरुकुत्या पडलेल्या, थरथरणारे हात, अंधूक होत चाललेली नजर मात्र तरीही एकमेकांच्या ओढीने आसुसणारा जीव. एकमेकांची तीच काळजी, जी कदाचित नवतारुण्यात असेल, तीच ओढ जी पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श झाल्यानंतर असेल. तोच निस्वार्थ भाव, जो कदाचित प्रेमात पडल्यानंतर आला असेल.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओत एक आजोबा आणि एक आजी बसलेली दिसते. दूरुन कुणीतरी हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा 2 पायांवर बसले आहेत, तर आजी जमिनीवर बसून त्यांना भरवत आहे. आजोबांचं वय जास्त असल्याने वृद्धत्त्वही जास्त आहे. आता एकामेकांशिवाय दोघांना कुणीही नाही, पण आजी जी जबाबदारी दाखवतेय, त्यातूनच त्यांच्या असलेल्या प्रेमाची कल्पना येऊ शकते.

हा व्हिडीओ IAS अधिकारी सुमिता मिश्रा यांनी शेअर केला आहे. कुणी विचारलं की, प्रेम काय असतं, तर सांगा या वयातही प्रेम होतं, असं मिश्रा यांनी पोस्ट करताना लिहलं आहे. 5 लाख 60 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तब्बल 4500 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर 35 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ खऱ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून शेअर केलं जात आहे. आजकाल महिन्याचं प्रेम, लग्न आणि त्यानंतर लगेच वेगळं होण्याचा ट्रेंड आला आहे. प्रत्येकाला प्रत्येकाबद्दल असणारी आपुलकी कमी होत चालली आहे. नातीही व्यवहाराच्या आकड्यांमध्ये गुंफली गेली आहेत, या सगळ्यात हा व्हिडीओ तुम्हाला पुन्हा त्याच माणूसपणाकडे घेऊन जातो, आणि सांगतो, की बाबा तुम्ही माणसं आहात, माणसांना जपा.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.