व्हॉट्सअपमध्ये लवकरच मिळणार AI जनरेटेड स्टीकर्स, चॅटींगचा अनुभव भन्नाट होणार
व्हॉट्सअप युजरना लवकरच एका भन्नाट फिचरचा वापर करता येणार आहे. चॅटींग करताना आता एआय जनरेटेड स्कीटरचा युजरना वापर करता येणार आहे.
नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : इस्टंट मॅसेजिंग एप्स व्हॉट्सअप आता वापरकर्त्यांचा चॅटींगचा अनुभव आणखीन चांगला करणार आहे. आता चॅटींग करताना एआयचा वापर करुन स्टीकर्स बनविता आणि शेअर करता येणार आहेत. WABetaInfo ने दिलेल्या वृत्तानूसार युजरचा चॅटींगचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी व्हॉट्सअप नव्या फिचरवर काम करीत आहे. सध्या केवळ बिटा व्हर्जन 2.23.17.14 मध्ये ही सुविधा मिळणार आहे. नंतर सर्व व्हाट्सअप धारकांना ही सुविधा मिळणार आहे.
व्हॉट्सअप युजरना लवकरच एका भन्नाट फिचरचा वापर करता येणार आहे. चॅटींग करताना आता एआय जनरेटेड स्कीटरचा युजरना वापर करता येणार आहे. व्हॉट्सअप युजरना व्हाट्सअपचे हे नवीन फिचर स्टीकर टॅबमध्ये मिळणार आहे. WABetaInfo ने या फिचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात AI जनरेटेड स्टीकर्ससाठी क्रिएट बटण पाहायला मिळणार आहे.
चुकीच्या स्टीकर्सचा रिपोर्ट करता येणार
चॅटींग करताना कोणी चुकीचे स्टीकर्स तयार केले तर त्याला रिपोर्ट करण्याची देखील सुविधा आहे. AI जनरेटेड स्टीकर्समुळे युजरना टेन्शन आले आहे की लोक त्याचा गैरवापर करून कोणाचेही स्टीकर्स तयार करतील. परंतू जेव्हा कंपनी या फिचरला अधिकृतरित्या लॉंच करेल तेव्हा त्याच्याबाबत नेमकी माहीती समोर येणार आहे.
WABetaInfo ने या फिचरचा स्क्रीनशॉट ट्वीटरवर शेअर केला आहे –
📝 WhatsApp beta for Android 2.23.17.14: what’s new?
WhatsApp is rolling out a feature to create and share AI stickers, and it is available to a very limited group of beta testers!https://t.co/spn8xvezZk pic.twitter.com/6iDf9cOdPf
— WABetaInfo (@WABetaInfo) August 14, 2023
अलिकडेच व्हॉट्सअपने तीन फिचर आणले
अलिकडेच व्हॉट्सअपने तीन नवीन फिचर लॉंच केले आहेत. यात स्क्रीन शेअरींग आणि लॅंडस्कॅप मोड आणि व्हिडीओ मॅसेज या सारख्या फिचरचा समावेश आहे. स्क्रीन शेअरींग फिचरमुळे युजरला व्हिडीओ कॉलींग दरम्यान आपल्या मोबाईल स्क्रीनला अन्य युजर्सला शेअर करता येणार आहे. तसेच व्हिडीओ कॉलींग दरम्यान आता मोबाईलला लॅंडस्कॅप मोडवर देखील वापरता येणार आहे.
याच बरोबर व्हिडीओ मॅसेज फिचरसह व्हॉट्सअप युजर्स शॉर्ट व्हिडीओ मॅसेज सेंड करु शकतात. या फिचरमुळे युजर 60 सेंकदापर्यंत रियल टाईम व्हिडीओला रेकॉर्ड करून पाठवू शकतात. हा मॅसेज देखील एण्ड टू एण्ड इन्क्रिप्टेड असणार आहे.