Twitter Revenue | ट्विटर एक्सच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करण्याची संधी, कसं ते जाणून घ्या
Twitter Ads Revenue: सोशल मीडिया हे माध्यम आता वेळकाढूपणाचं राहिलं नसून त्यातून लाखोंची कमाई करता येणार आहे. आता यात ट्विटर एक्सने उडी घेतली असून युजर्संना फायदा होणार आहे.
मुंबई : ट्विटर एक्सने नुकतंच आपल्या प्लॅटफॉर्मवरून युजर्संना कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा आता युजर्संना होताना दिसत आहे. काही युजर्सच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत. याबाबत चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. युजर्संनी सुरु केलेल्या स्क्रिनशॉटच्या माध्यमातून ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. जर तुम्हालाही ट्विटरच्या माध्यमातून पैसा कमवायचा असेल तर सोपी पद्धत फॉलो करा आणि लाखोंची कमाई करता येणार आहे. पण यासाठी कंपनीच्या काही नियम फॉलो करणं गरजेचं आहे.
ट्विटर एक्सवरून कशी करता येईल कमाई?
एलन मस्क यांच्या ॲड्स रेव्हेन्यू प्रोग्राममधून पात्र क्रिएटर्संना पैसे मिळणार आहेत. कंपनीला होत असलेल्या ॲड रेव्हेन्यूमधील काही भाग क्रिएटर्संना दिला जात आहे. तुम्हालाही ट्विटर एक्सवरून कमाई करायची असेल तर तुमचे 500 हून अधिक फॉलोवर्स असणं गरजेचं आहे. यासह मागच्या तीन महिन्यात अकाउंटवरून ऑर्गेनिक 15 मिलियन ट्विट इंप्रेशन होणं गरजेचं आहे. जर या तीन अटी पूर्ण असतील तर तुम्ही एलन मस्क यांच्या ॲड्स रेव्हेन्यू प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचं ट्विटर अकाउंट मोनेटाइज करणं गरजेचं आहे.
900 रुपये भरले आणि ट्विटरच्या माध्यमातून लाखोंची कमाई
सोशल मीडियावर काही युजर्संने आपल्या पैसे मिळाल्याची माहिती शेअर केली आहे. यासाठी त्यांनी स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. स्क्रिनशॉटनुसार, क्रिएटर्संना इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे ट्विटरवरून पैसे मिळायला सुरुवात झाली आहे.
Blue tick ke paise vasool pic.twitter.com/pVrX5hTYWo
— Gabbar (@GabbbarSingh) August 8, 2023
ट्विटर एक्स सब्सक्रिप्शन प्लान
ट्विटर एक्सच्या सब्सक्रिप्शन प्लानबाबत बोलायचं तर, भारतात वेब युजर्संना यासाठी 650 रुपये आणि मोबाईल युजर्संना 900 रुपये मासिक प्लान घ्यावा लागेल. वार्षिक प्लानसाठी 6800 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच मासिक प्लानच्या तुलनेच वार्षिक प्लान स्वस्त आहे. म्हणजेच महिन्याचे 566.67 रुपये होतात.
काय आहे प्रक्रिया
- तुमचं वय 18 किंवा त्यापेक्षा अधिक असावं
- अकाउंट ने, बायो, प्रोफाईल पिक्चर आणि हेडर इमेज असणं गरजेचं आहे.
- इमेल ॲड्रेस व्हेरिफाईड असायला हवं.
- आपल्या अकाउंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अक्टिव्हेट करा
- ट्विटर युजर्स ॲग्रीमेंट किंवा काँटेंट मॉनिटायझेशन स्टडर्डचं वारंवार उल्लंघन होता कामा नये.
- तुमच्या प्रोफाईलवर दुसऱ्या व्यक्तीची आयडेंटिटी, ब्रँड किंवा ऑर्गनायझेशनचं उल्लेख नसावा.
- ट्विटरवर ब्लू टिक असणं गरजेचं आहे किंवा ट्विटर व्हेरिफाईड अकाउंट असावं
- ट्विटर अकाउंट 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ ॲक्टिव्ह असावं.
- कमीत कमी 500 युजर्स असावेत.
- मागच्या 30 दिवसात तुमच्या खात्यावर काँटेंट पोस्ट केलेलं असावं.