Charging | काढ रे तो मोबाईल! स्मार्टफोन 100 टक्के चार्ज करताय? आत्ताच थांबा
Charging Tips | तु्म्ही तुमचा स्मार्टफोन हा 100 टक्के चार्ज करताय का? थांबा आणि जाणून घ्या स्मार्टफोन जास्तीत जास्त किती टक्के चार्ज करायचा?
मुंबई | आपल्या प्रत्येकाच्या आयुष्या स्मार्टफोनचं अनन्यसाधारण महत्व आहे. प्रवासापासून ते प्रत्येक खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण सरार्सपणे स्मार्टफोनचा वापर करतो. प्रवासादरम्यान तिकीट काढायची असो किंवा एखाद्या वस्तूचं बिल भरायचं असो, सर्वकाही व्यवहार मोबाईलद्वारेच होतात. त्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग हा फॅक्टर महत्तवाचा ठरतो. घरातून बाहेर पडताना एक वेळ पाकीट नसेल तरी चालेल, मात्र मोबाईलमध्ये चार्जिंग 100 टक्के हवी, असा अनेकांचा अट्टाहासच असतो. तुम्हीपण तुमचा स्मार्टफोन 100 टक्के चार्जिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
100 टक्के चार्ज केल्याने स्मार्टफोन डॅमेज होण्याची शक्यता असते. आता तुम्ही म्हणाल की स्मार्टफोन 100 टक्के चार्ज नाही करायचा मग किती करायचा? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. स्मार्टफोन चार्जिंगसाठी कायम 80-20 हा फॉर्म्युला वापरायला हवा. कारण याच फॉर्म्युल्यामुळे तुमचा स्मार्टफोन अधिक काळ वापरण्याजोगा राहतो. तसेच स्मार्टफोन किंवा इतर पार्ट डॅमेज होण्याची शक्यताही उद्भवत नाही.
80-20 फॉर्म्युला
आता तुम्ही म्हणाल 80-20 फॉर्म्युला नक्की काय? तर स्मार्टफोनमधील चार्जिंग 20 टक्क्यांपर्यंत उतरु देऊ नका. म्हणजेच 20 टक्के बॅटरी शिल्लक असेल तर तो स्मार्टफोन तातडीन चार्जिंगला लावा, याामुळे बॅटरीवर प्रेशर येत नाही आणि बॅटरी लाईफ वाढते.
मोबाईल किती टक्के चार्ज करायचा?
मोबाईल चार्ज करताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तधीही 100 टक्के चार्जिंग करु नये. मोबाईल 100 टक्के चार्ज केल्याने स्मार्टफोन हीट होतो त्याचा ताण हा बॅटरीवर होतो, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता असते. इतकंच नाही, तर बॅटरी लाईफ कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे कायम स्मार्टफोन हा जास्तीत जास्त 80 टक्केच चार्जिंग करावी. तसेच मोबाईलची चार्जिंग 20 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही, याची काळजी घ्या